भाजपलाही नगरसेवक फुटण्याची धास्ती : पाच राज्यांत फिरवून आणण्याची व्यवस्था!

या १३ दिवसांत त्यांच्या प्रभागातील प्रश्न कोण सोडविणार, असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळं नगरसेवक Corporators पर्यटनावर आणि जनता वाऱ्यावर अशी परिस्थिती निर्माण झालीय.
भाजपलाही नगरसेवक फुटण्याची धास्ती : पाच राज्यांत फिरवून आणण्याची व्यवस्था!
Nagpur Municipal CorporationSarkarnama

नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक ‘नॉट रीचेबल’ होणार आहेत. नगरसेवकांचं निवडणूक पर्यटन शनिवारी २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. भाजपकडे असलेल्या मतांचा ३३१ हा आकडा पक्का आहे आणि शिस्तबद्ध पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे. तरीही आपलेच नगरसेवक फुटण्याची धास्ती भाजपने घेतल्याचे दिसते. घोडेबाजार होण्याची शक्यता गृहीत धरून कुठलाही धोका पत्करायचा नसल्याने हा दौरा आखण्यात आल्याचे कळते.

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून भाजप आपल्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी नेणार आहे. या निवडणुकीत नगरसेवक फुटू नये, यासाठी भाजप पुरेपूर काळजी घेत आहे. साधारणतः ११ ते १३ दिवस नगरसेवक देशातील वेगवेगळ्या राज्यांत आणि वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे, अशा ठिकाणी नगरसेवकांना ठेवलं जाणार असल्याची माहिती आहे.

नगरसेवक पर्यटनावर आणि जनता वाऱ्यावर..

यामध्येही नगरसेवकांना चॉईस दिला जाणार आहे. जम्मू-काश्मीर, लेह-लद्दाख, गोवा, हिमाचल प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये नगरसेवकांच्या चॉईस नुसार नगरसेवकांना ठेवलं जाणार आहे. यासाठी १५-१५चे ग्रुप आणि ग्रुप लीडर ठरविण्यात आले आहेत. या नगरसेवकांना मोबाईल जवळ ठेवण्याची सुद्धा परवानगी नाहीये. त्यामुळं प्रभागांतील समस्या कशा सुटतील हाही एक प्रश्न आहे. भाजप मात्र घोडेबाजार होऊ नये आणि एज्युकेशन टूर असल्याचं सांगतंय. निवडणुकीच्या निमित्ताने नगरसेवकांचं निवडणूक पर्यटन होणार आहे. १३ दिवस नगरसेवक फुकटात ऐश करणार आहे. मात्र, या १३ दिवसांत त्यांच्या प्रभागातील प्रश्न कोण सोडविणार, असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळं नगरसेवक पर्यटनावर आणि जनता वाऱ्यावर अशी परिस्थिती निर्माण झालीय.

मतदानाच्या पूर्वसंध्येला येणार शहरात..

मतदानाच्या पूर्वसंध्येला नगरसेवक शहरात येणार आहेत. कॉंग्रेसकडून साडेतीन दशक भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनी उमेदवारी दाखल करून रंगत निर्माण केली. डॉ. भोयर यांच्या उमेदवारीमुळे भाजपने सावध भूमिका घेतली. काल, बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवकांसोबत चर्चा केली. या सर्व नगरसेवक, नगरसेविकांना वेगवेगळ्या गटांत विभागण्यात आले आहे. उत्तम सुविधा करता यावी, यासाठी १५ ते २० नगरसेवकांचा एक गट तयार करण्यात आला आहे. विधानसभानिहाय गट तयार करण्यात आले आहेत. भाजपने जोखीम न घेण्याचा निर्णय घेतल्याने या सर्वच नगरसेवकांना २७ नोव्हेंबरला सहलीला रवाना करण्यात येणार आहे. हे नगरसेवक वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणार आहेत.

Nagpur Municipal Corporation
सोलापूरला वगळल्याने विधानपरिषद निवडणूकीला आव्हान देणार, इतर उमेदवार टेन्शनमध्ये

विधानपरिषद निवडणुकीसाठी १० डिसेंबरला मतदान असून सर्व नगरसेवक मतदानाच्या पूर्वसंध्येला अर्थात ९ डिसेंबरला शहरात येतील. त्यामुळे जवळपास तेरा दिवस नगरसेवक शहरात राहणार नाहीत. त्यामुळे या काळात स्वच्छता, सिवेज लाइनचे तुंबण्यासह इतर किरकोळ समस्या नागरिक कुणाकडे घेऊन जातील? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकारी, कर्मचारी सामान्य नागरिकांचे ऐकत नाही, ही वास्तविकता अनेकदा पुढे आली आहे. स्वच्छता, सिवेज लाइन दुरुस्तीची कामे नगरसेवकांच्या एका फोनवर होतात. एवढेच काही नगरसेवकांना फोन केला तरी नागरिकांची ही कामे होते. परंतु, पुढील १३ दिवस नगरसेवक संपर्काबाहेर राहणार आहेत. फोनवरही त्यांच्याशी सामान्य नागरिकांचे बोलणे होणार नाही. त्यामुळे शहरातील ६५ टक्के प्रभागात समस्यांचे ढीग उभे राहण्याची शक्यता आहे.

पदाधिकारी होणार प्रति नगरसेवक?

नगरसेवकांच्या अनुपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रति नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. पुढील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदाधिकाऱ्यांची नागरिकांच्या समस्या सोडविण्याची रंगीत तालीमही होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

नगरसेवक शहराबाहेर जाणार असल्याने प्रभागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, याबाबतही काळजी घेण्यात आली आहे. भाजपच्या वॉर्ड अध्यक्षांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येतील. याशिवाय समस्यांबाबत तक्रारीसाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध आहे.

- अविनाश ठाकरे, सत्तापक्ष नेते, महापालिका.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in