बिहारचे खासदार डॉ. राकेश सिन्हा म्हणाले, ‘हां, अणेजी का स्मारक बनाना है !’

लोकनायक बापूजी अणे स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या माध्यमातून दिल्ली येथे खासदार डॉ. सिन्हा यांची भेट घेण्यात आली.
PM Narendra Modi's Scheem
PM Narendra Modi's ScheemSarkarnama

पुसद (जि. यवतमाळ) : वणीच्या लोकनायक बापूजी अणे यांनी पुसद तालुक्यातील धुंदी- बेलगव्हाण जंगलात सविनय कायदेभंग करण्यासाठी 'जंगल सत्याग्रह' केला व ब्रिटिशांविरुद्ध रान उठविले. स्वातंत्र्य चळवळीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा होता. मात्र, त्यांचे पुसद येथे अद्याप कुठलेही स्मारक नाही. ज्या मार्गावरून जंगल सत्याग्रहासाठी बापूजी हजारो स्वातंत्र्य प्रेमी लोकांसमवेत चालत गेले, त्या रस्त्याला बापूजी अणे यांचे नावही नाही, याबद्दल बिहारचे (Bihar) खासदार डॉ. राकेश सिन्हा (Dr. Rakesh Sinha) यांनी आश्चर्य व्यक्त केले.

पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकार द्वारे गठीत स्वतंत्रता अमृत महोत्सव' समितीचे डॉ. सिन्हा प्रमुख पदाधिकारी आहेत. स्वातंत्र्य आंदोलनातील मुख्य स्थळांना भेटी देऊन स्मारक उभारण्यासाठी या समितीच्यावतीने निधी देण्यात येतो. मात्र, संपूर्ण भारतातील (India) पहिला जंगल सत्याग्रह पुसद तालुक्यातील धुंदी- बेलगव्हाण येथे झाल्यानंतरही अमृत महोत्सवी योजनेपासून वंचित राहिले. याची दखल घेत लोकनायक बापूजी अणे स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या माध्यमातून दिल्ली येथे खासदार डॉ. सिन्हा यांची भेट घेण्यात आली. त्यावर सकारात्मक पाऊल उचलत डॉ. सिन्हा यांनी सोमवारी पुसद येथील लोकनायक बापूजी अणे जयंती सोहळ्याला हजेरी लावून बापूजींच्या कार्याला अभिवादन केले.

बिहार मधील पाटण्यात राज्यपाल म्हणून बापूजी अणे यांनी सामाजिक काम केले. तेथील मुख्यमंत्री निवासस्थानासमोरील मुख्य रस्त्याला 'अणे मार्ग' असे नाव आहे. तेव्हा अणे कळले नव्हते. आज विदर्भातील या उत्तुंग नेत्याचे ग्रंथ वाचनातून महत्त्व कळले. पाटण्याप्रमाणेच पुसदमध्येही मुख्यमार्गाला ' बापूजी अणे मार्ग' असे फलक लावावे. नव्या पिढीला त्यांच्या जंगल सत्याग्रहाचे महत्त्व कळेल. या शब्दांत खासदार डॉ.राकेश सिन्हा (बिहार) यांनी लोकनायक बापूजी अणे यांच्या बद्दलच्या भावना जयंती सोहळ्यात व्यक्त केल्या.

पुसदला येताना धुंदी-बेलगव्हाण जंगलातील जंगल सत्याग्रहाच्या स्मृतीशिलेचे खासदार सिन्हा यांनी दर्शन घेतले. तेव्हा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष वसंतराव पाटील कान्हेकर व जोशी यांनी अमृत महोत्सवातून स्मारक बनविण्याची अपेक्षा व्यक्त केली. क्षणभर नतमस्तक होत खासदार सिन्हा म्हणाले - ‘हां, अणेजी का स्मारक बनाना है !’ त्यांच्या या उद्गारातून स्मारकाची अपेक्षा उंचावली आहे. वनविभागात स्मारक बनविता येणार नाही, पुसद शहरात हे स्मारक उभारता येईल. त्यासाठी टिळक स्मारक मंडळाने जागा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. जंगल सत्याग्रहाचे स्मारक उभे राहिल्यास नव्या पिढीला निश्चितच प्रेरणा मिळेल.

PM Narendra Modi's Scheem
संसदीय बोर्डातून पत्ता कट झाल्यानंतर गडकरी पहिल्यांदा थेटच बोलले...

स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची पुनर्रचना?

महात्मा गांधी, नेहरू, सुभाष चंद्र बोस, मौलाना आझाद यांच्यासारख्या स्वातंत्र्य योध्यांची महत्वपूर्ण भूमिका होतीच. सोबत ओरिसा, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यातील विद्यार्थी तसेच सामान्य लोकांनी ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. त्यांचीही दखल स्वातंत्र्य इतिहासात घेतली जावी. केवळ एका परिवारासाठी स्वातंत्र्याच्या इतिहासाची तोडफोड होऊ नये. मूठभर नव्हे तर हजारो लोक स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झाले. त्यामुळे जनश्रुत व तथ्यावर आधारित इतिहासाची पुनर्रचना करण्याची गरज खासदार सिन्हा यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in