मोठी बातमी ः नाना पटोलेंना वाढदिवसाच्या आदल्या दिवशी उपाध्यक्षाचा गंभीर इशारा...

नानां पटोलेंनी (Nana Patole) स्वतः घोटाळेबाज लोकांची नियुक्ती केली आहे आणि त्या नियुक्तीच्या विरोधात भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष आजबले यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
Nana Patole, Congress.
Nana Patole, Congress.Sarkarnama

भंडारा : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा उद्या ५ जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरात काल एक कार्यक्रम पार पडला. नानांना वाढदिवसानिमित्त भेट देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते तयारीला लागलेले आहेत. पण जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष आजबले यांनी आज नानांच्या समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

नाना पटोले (Nana Patole) यांच्या त्यांना गृहजिल्ह्यात घरचा अहेर मिळाला आहे. नानांनी स्वतः घोटाळेबाज लोकांची नियुक्ती केली आहे आणि त्या नियुक्तीच्या विरोधात भंडारा (Bhandara) जिल्हा काँग्रेस (Congress) कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष आजबले यांनी नाना पटोले यांच्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. घोटाळेबाजालाच खनिकरण कमिटीवर घेतल्याचा आरोप करून आजबले हे पटोलेंच्या समोर आत्मदहन करणार आहे. आज नाना पटोले भंडाऱ्यात आहेत. त्यामुळे कुठल्याही क्षणी ही घटना घडू शकते.

स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात जर एका उपाध्यक्षाला आपल्या मागणीसाठी जर आत्मदहन करण्याचा इशारा द्यावा लागत असेल तर भंडारा जिल्हा काँग्रेसमध्ये आपसी वाद किती मोठ्या प्रमाणात फोफावला आहे, हे चव्हाट्यावर आले आहे. भंडारा तालुक्यातील नवरगाव येथे मोठ्या प्रमाणात खाणीमध्ये अवैध उत्खनन सुरू असल्याचा आरोप सुभाष आजबले यांनी केला आहे. या घोटाळ्यात शेषराज रामटेके यांचा सहभाग असल्याने त्याची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी कित्येक वर्षापासून आजबले सतत करत आहेत.

Nana Patole, Congress.
नाना पटोले म्हणाले, भाजपच्या गर्वाचे लवकरच हरण होईल...

नाना पटोले यांनी घोटाळेबाज शेषराज रामटेके यांची जिल्हा खनिकर्म सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे. मी सतत चौकशीची मागणी करत असतानासुद्धा नाना पटोले यांनी त्याच घोटाळेबाजाला खनिकर्म समितीवर नियुक्त करणे म्हणजे आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असा आरोप सुभाष आजबले यांनी केला आहे. त्यामुळे जोपर्यंत घोटाळेबाज रामटेके यांची समितीवरून हकालपट्टी होत नाही आणि त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर नाना पटोले यांच्या समोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्याने थेट प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या गृहजिल्ह्यात इशारा दिल्याने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com