Code of Conduct : आचार संहितेमध्ये केले भूमिपूजन, एफएसटीने दिला चुकीचा अहवाल, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार...

ZP Member : पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन केल्याचा आरोप मोहन माकडे यांनी केला आहे.
Nagpur Division Teachers Constituency Election
Nagpur Division Teachers Constituency ElectionSarkarnama

Nagpur Division Teachers Constituency Election : नागपूर (Nagpur) विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना भिलगाव ग्रामपंचायतीच्या (Grampanchayat) सरपंच भावना फलके, उपसरपंच मनोज जिभकाटे आणि सदस्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन केल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे यांनी केला आहे.

यासंदर्भात माकडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे (Collector) तक्रार केली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भिलगावच्या सरपंच, उपसरपंच आणि सहभागी सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तक्रारीत माकडे म्हणतात, कामठी तालुक्यातील भिलगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत कामाचे भूमिपूजन सरपंच भावना फलके, उपसरपंच मनोज जिभकाटे, सदस्य शेखर वंजारी, राजेश लेंडे, आशिष भनारे, रेनुराणी सोनी, लतेश्‍वरी काळे, नेना देशभ्रतार, उषा उके, पल्लवी चौधरी, रुपाली बंगाडकर, सपना बोदोले यांनी ८ जानेवारीला सकाळी ११ वाजता केले.

नागपूर शिक्षक मतदारसंघाची आचार संहिता लागू असल्याने प्रलोभन देणारे कुठलेही कार्य करणे योग्य नाही. त्याचा मतदानावर परिणाम होतो. त्यामुळे सर्व संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. या तक्रारीनंतर उड्डान भरारी पथकाचे चंद्रकांत तोडकर यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली. त्यांनी ‘भारत निर्वाचन आयोग, नवी दिल्ली यांच्या पत्रानुसार, २६ डिसेंबर २०१६ मध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदार यांना या योजनेमुळे कोणतेही लाभ किंवा प्रलोभन दिलेले नाहीत.

सदर कामाचा कार्यादेश ०९.११.२०२२ रोजीचा म्हणजे निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वीचा असल्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग केलेला नसल्याचे दिसून येते.’ असा अहवाल दिला. या अहवालावर तक्रारकर्ते मोहन माकडे यांचे समाधान झाले नाही. म.जि.प्रा.वी. नागपूर यांचे काम सुरू असून ०८.०१.२०२३ ला सदस्यांनी नारळ फोडून भूमिपूजन केले. पण नाव माहिती नाही, असे तोडकर यांनी अहवालात लिहिले आहे. त्यामुळे भूमिपूजन झाल्याचे निष्पन्न होते आहे. म्हणून तोडकर यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी मोहन माकडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

भिलगावमध्ये ज्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे, तेथे लोकवस्ती आहे. पण चौकशी करताना तोडकर यांनी कुणालाही विचारणा केली नाही. त्यांनी अहवालात ‘श्री मोहन माकडे यांना फोनद्वारे विचारणा केली’, असे लिहिले आहे. पण तोडकरांचा मला कधीही फोन आला नाही. त्यामुळे विचारणा करण्याचा प्रश्‍नच नाही. खोटा अहवाल देणाऱ्या तोडकरांवर कारवाई करावी आणि दुसरा सक्षम अधिकारी नेमावा, असे मोहन माकडे यांनी म्हटले आहे. या तक्रारीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काय कारवाई होते, हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे.

`ते’ भूमिपूजन नियमाप्रमाणेच - फलके

नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमिपूजन केल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे यांनी केली. त्यानंतर चौकशी करून एफएसटीने (उड्डान भरारी पथक) अहवाल दिला आहे. त्यामध्ये कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन झालेले नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे ते भूमिपूजन नियमांप्रमाणेच होते, असे सरपंच भावना फलके यांच्यावतीने निखिल फलके यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com