'भीमाशंकराने' वळसे पाटलांना शक्ती द्यावी आणि त्यांनी गृहमंत्रीपद फेकून द्यावं…

सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. या निर्देशांनुसार बदल्यांचा अधिकार पोलिस महासंचालकांचा आहे, असे आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) म्हणाले.
'भीमाशंकराने' वळसे पाटलांना शक्ती द्यावी आणि त्यांनी गृहमंत्रीपद फेकून द्यावं…
Dilip Walse-PatilSarkarnama

नागपूर : पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या १२ तासांत रद्द झाल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या बदल्यामुळे नगर रचना मंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. तर यासाठी गृहमंत्र्यांवर दबाव असल्याचीही माहिती आहे. दबावात काम करावे लागत असेल तर वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) गृहमंत्रीपद फेकून द्यावे, असे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना आमदार मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) म्हणाले, पोलिस विभागातील बदल्या कशा कराव्या, या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) काही निर्देश दिले आहेत. या निर्देशांनुसार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे, हा पोलिस महासंचालकांचा अधिकार आहे. तो नगर रचना खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा अधिकार नाही. एकनाथ शिंदे नगर रचना विभागाच्या बदल्या करतात, तेव्हा कोणत्या आमदारांना विचारतात? चंद्रपुरात ज्या आयुक्तावर आरोप होते, त्यांना ४ महिन्यांत पाठवले. कोणत्या अधिकाराने हे करता येते, असा सवाल करीत तुमच्या मनाने पोलिस अधिकारी तुमच्या भागात दिले नाही आणि चांगले अधिकारी जर या भागात आले तर आपण अडचणीत येऊ, या भावनेने जर हे काम केले असेल तर योग्य नाही.

भीमाशंकराने गृहमंत्र्यांना शक्ती द्यावी..

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आमचे मित्र आहेत, भिमाशंकर ज्योतीर्लिंग त्यांच्या मतदारसंघात आहे. मी भिमाशंकरला प्रार्थना करतो की, गृहमंत्र्यांना शक्ती द्यावी. गृहमंत्र्यांवर बदल्यांसाठी जर दबाव असेल, तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावे, असे आव्हान आमदार मुनगंटीवार यांनी दिले. बदल्यांमध्ये पसंती, नापसंती हा प्रश्‍नच उपस्थित होत नाही. नियमांच्या चौकटीत पोलिस विभागाच्या बदल्या कशा कराव्या, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. या निर्देशांनुसार बदल्यांचा अधिकार पोलिस महासंचालकांचा आहे, असे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Dilip Walse-Patil
मुनगंटीवार म्हणाले, सत्ता मे जो आये है, जरा याद करो इनकी बेईमानी…

बदल्या रद्द झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश परत घेण्याचे कारण काय, हे समजले पाहिजे. प्रशासकीय चूक झाली की, मागच्या वेळेस १० अधिकाऱ्यांचे बदली आदेश थांबवले, असा सवाल करीत बदली घोटाळा सीबीआयच्या स्कॅनरमध्ये आहे. आताही तसा प्रकार आहे का, हे समजले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.