Bhide Guruji : भिडे गुरूजी महिला पत्रकाराला म्हणाले, आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलीन !

भिडे गुरूजी (Bhide Guruji) काही कामानिमित्त आज मंत्रालयात (Mantralay) आले होते. दरम्यान साम टीव्ही या मराठी वृत्त वाहिनीच्या महिला पत्रकाराने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो, असे म्हणत त्यांनी त्यांचा अपमान केला.
Bhide Guruji
Bhide GurujiSarkarnama

नागपूर : सातत्याने वादग्रस्त विधान करत आलेले भिडे गुरूजी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आज काही कामानिमित्त ते मुंबईला (Mumbai) मंत्रालयात आले होते. तेव्हा साम टीव्ही या वृत्त वाहिनीच्या महिला पत्रकाराने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी उद्धटपणे बोलत महिला पत्रकाराचा अपमान केला.

संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरूजी (Bhide Guruji) काही कामानिमित्त आज मंत्रालयात (Mantralaya) आले होते. दरम्यान साम टीव्ही या मराठी वृत्त वाहिनीच्या महिला पत्रकाराने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो, असे म्हणत त्यांनी त्यांचा अपमान केला. भिडे गुरूजी मंत्रालयात आले असता गुरूजी आज तुम्ही मंत्रालयात आला आहात. आज आपण कुणाची भेट घेतली, असे महिला पत्रकाराने विचारताच, ‘आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलीन’, असे भिडे गुरूजी महिला पत्रकाराला म्हणाले.

‘आमची अशी भावना आहे की, प्रत्येक स्त्री ही भारत मातेचे रूप आहे आणि भारत माता विधवा नाही आहे. त्यामुळे तू कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो.’ असे म्हटल्यानंतर महिला पत्रकाराला काय बोलावे, हे सुचले नाही. त्यानंतर हा संवाद थांबला आणि या घटनेवर प्रतिक्रिया येऊ लागल्या. कुंकू लावा, असं भिडे कसं सांगू शकतात, असे प्रश्‍न समाजाच्या विविध स्तरातून विचारण्यात आले. वाट्टेल ते बोलून महिलेचा अपमान करण्याचा अधिकार भिडेंना कुणी दिला, असे प्रश्‍न समाजातून उठू लागले आहेत.

आज त्यांना नोटीस पोहोचेल - रुपाली चाकणकर

राज्य महिला आयोगाकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले होते की, २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने विधवा प्रथा बंदीचा ठराव करावा. असे ठराव करून विधवांना समाजात मान, सन्मान मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहो. हे काम करीत असताना महिला आपल्या कर्तृत्वाने आपले अस्तित्व सिद्ध करीत असते. परंतु महिलांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी समाजातली काही तत्त्व अशा प्रकारची कृत्ये करीत असतात. त्यामुळे भिडे गुरूजींना आज महिला आयोगाची नोटीस पोहोचून जाईल, असे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सांगितले.

Bhide Guruji
भिडे गुरूजी म्हणाले; औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या इस्लामच्या पोटतिडकिने केली

भिडे गुरूजींची महिलांच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ - निलम गोऱ्हे

मंत्रालयामध्ये आज भिडे गुरूजींसोबत महिला पत्रकाराने बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ‘आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलीन’, असे म्हणत त्यांनी महिला पत्रकाराचा अपमान केला. महिलांच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करणारे विचार भिडे गुरूजींनी मांडले आहेत. भारत माता कुमारिका असेल, विधवा असेल किंवा काहीही असेल तरी आपल्या भावनांशी निगडित आहे. त्यामुळे भिडे गुरूजींचे हे वक्तव्य निषेधार्ह आहे, असे शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com