मनी लॉण्ड्रिग प्रकरणात भावना गवळींना दिलासा; सईद खानला सशर्त जामीन

Bhavna Gawali | Money laundering | भावना गवळी या यवतमाळ- वाशीम मतदारसंघाचे खासदार आहेत
मनी लॉण्ड्रिग प्रकरणात भावना गवळींना दिलासा;  सईद खानला सशर्त जामीन

मुंबई : शिवसेना खासदार भावना गवळी यांचे जवळचे सहकारी सईद खान यांना उच्च न्यायालयाने 1 जुलै रोजी 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना सईद खान यांच्यावर काही कठोर अटी देखील घातल्या.

भावना गवळीशी संबंध असलेल्या एका ट्रस्टच्या चौकशीत गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली सईद खानला सप्टेंबरमध्ये २०२१ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. गवळी या यवतमाळ वाशीम मतदारसंघाचे खासदार आहेत. या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून त्यांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. या दिलाशामागे गवळी या सध्या शिंदेच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे.

मनी लॉण्ड्रिग प्रकरणात भावना गवळींना दिलासा;  सईद खानला सशर्त जामीन
'राष्ट्रवादी'च्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच असं घडलं अन् अजितदादांना मिळाला पहिला मान!

महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील कथित घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी सुरू आहे. दरम्यान, इडीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठान (सेक्शन ८ कंपनी) कडून बेकायदेशीरपणे निधी पळवून नेल्यासंदर्भात सईद खान यांची ३.७५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. याप्रकरणी सईद खान यांच्यावतीने त्यांचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयाने काही अटी व शर्तीच्या आधारावर सईद खानचा जामीन मंजूर केला.

सईद खान यांना त्यांचा पासपोर्ट ट्रायल कोर्टात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देश सोडू नये, पुराव्याशी छेडछाड करु नये, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. याशिवाय तपास अधिकाऱ्यांना आपला सध्याचा पत्ता आणि मोबाइल नंबरची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. सईद खान यांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाला अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. भावना गवळींनी ५५ कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड कारखाना फक्त २५ लाखात घेतला. सन २०१९ मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठान च्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती. ७ जुलै २०१९ रोजी झालेल्या चोरीची तक्रार १२ मे २०२० रोजी करण्यात आली. यावर चोरीची तक्रार १० महिन्यांनी का दिली? त्या कार्यालयात ७ कोटी कुठून आले?” असे अनेक सवाल सोमय्या यांनी उपस्थित केले होते. या संदर्भात केंद्रीय सहकार विभाग, सीबीआय, ईडी, स्टेट बँक, नॅशनल को- ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com