Bhandara : जातीय सलोखा निर्माण करणारा ठरला राज्य सरकारचा ‘हा’ निर्णय !

State Government : राज्य सरकारच्या निर्णयानंतर भंडारा प्रशासन सुद्धा नावे बदलविन्याच्या कामाला लागला आहे.
Bhandara
BhandaraSarkarnama

Bhandara District News : पूर्वापारपासून काही गावे आणि मोहल्ले जातिवाचक नावांनी ओळखले जात होते. त्यामुळे बरेचदा वादही झाल्याचे बघायला मिळाले आहे. असे होऊ नये यासाठी राज्य सरकारने जातिवाचक नावे बदलवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी भंडारा जिल्ह्यात करण्यात आली आहे.

भंडारा जिल्हा जातिवाचक नावांतून मुक्त झाला आहे. एखादा भाग आता समाज सुधारकाच्या नावावरून ओळखला जाणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर भंडारा प्रशासन सुद्धा नावे बदलविन्याच्या कामाला लागला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील ४९ पैकी ४६ नावे बदलविन्यात आले आहे।

जाती व विशिष्ट समुहाचा उल्लेख असणारी गावांची नावे बदलण्याचा निर्णय राज्य सरकार घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाद्वारे त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली असून जातीवाचक वस्त्या आणि गावांच्या नावांत केला जात आहे. त्याअंर्तगत जिल्ह्यातील ४९ पैकी ४६ गावांची नावे बदलण्यात आली आहे. यात शहरी भागातील ३२ तर ग्रामीण भागातील १४ नावांचा समावेश आहे. भंडारा शहरात ८, तुमसर शहरात ५, पवनी १८ पैकी १७, मोहाडीत १ आणि लाखनी तालुक्यात १ हा नामबदल झाला आहे,

पवनी तालुक्यात ८, मोहाडी १ आणि लाखनी तालुक्यात ४ पैकी २ आणि लाखांदुर तहसीलमधून १ जातिवाचक गावाचे नाव बदलविण्यात आले आहे. यात ढीवरवाढाचे शिवनेरी अशा पद्धतीने नावे बदलण्यात आली आहेत. भंडारा शहरात तर समाजसुधारकाच्या नावाने प्रभाग ओळखले जात आहेत. तेलीपुरा आता संत जगनाडे महाराज नगर, सिंधी कॉलनी आता गुरुनानक वार्ड, कहारपूरा आता जय संताजी वार्डने ओळखला जात आहे.

Bhandara
Bhandara : भंडाऱ्यातही रुजणार बीआरएसची पाळेमुळे, लवकरच जिल्हा शाखेची स्थापना !

गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील अनेक वस्त्याची, गावांची आणि शहरातील छोट्या नगरांची नावे जातिवाचक असल्याने ही बाब महाराष्ट्राला (Maharashtra) भुषणावह नसल्याचे लोक सांगत आहेत. राज्य सरकारच्या (State Goernment) जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय योग्य असल्याचे भंडारावासी (Bhandara) सांगत आहेत. सामाजिक सलोखा आणि सौदार्ह निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मकता वाढविण्यास हा निर्णय महत्वाचा करणारा असल्याची भावना नागरिक भंडाऱ्याचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी म्हटले आहे.

आपल्या स्वार्थासाठी विदेशी शत्रू एकमेकांत जातीय तेढ निर्माण करून लोकांची माथी भडकवित असताना राज्य सरकारचा हा निर्णय नक्कीच जातीय सलोखा निर्माण करणारा आहे, असे महेश निमजे, अक्षय खोब्रागडे, दिलीप देशमुख आदींनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com