Bhandara : स्वतः पोलिसच भरवतात कोंबड बाजार, अन् तेसुद्धा चक्क फडणवीसांच्या जिल्ह्यात !

Cockfighting : स्वतः लाखांदूर पोलिसच कोंबड बाजार भरवत आहेत.
Cockfighting in Devendra Fadanvis's District
Cockfighting in Devendra Fadanvis's DistrictSarkarnama

Cockfighting in Devendra Fadanvis's District : कोंबड्यांच्या झुंजी लावणे आणि त्यावर जुगार खेळणे, या प्रकाराला महाराष्ट्रात कायद्याने बंदी आहे. कुठे असा प्रकार आढळला तर पोलिस कारवाई करतात. पण पोलिसच कोंबड बाजार भरवत असतील आणि स्वतः पोलिसच कोंबड्यांची झुंज लावत असेल, तर... हा प्रश्‍न पडला आहे. भंडारा जिल्ह्यातील लोकांना.

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि गृहमंत्रीसुद्धा तेच आहेत. अशा जिल्ह्यात पोलिसांना कुणाचा धाक असू नये, याचे आश्‍चर्य वाटते. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर पोलिसांकडून अवैध कोंबड बाजाराला प्रोत्साहन दिले जात आहे. येवढेच नव्हे, तर स्वतः लाखांदूर पोलिसच कोंबड बाजार भरवत आहेत. पोलिस कोंबड्यांची झुंज लावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

कायद्याचे रक्षक म्हणविणारे स्वतः अवैध गुंतले असल्याचे ऐकून सामान्य माणसाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पालक जिल्ह्यात लाखांदुर पोलिसांकडून अवैध कोंबड बाजार भरविला जात असल्याचे बघून लोक आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत.

Cockfighting in Devendra Fadanvis's District
Devendra Fadanvis News : आम्ही अर्धवट काहीच करत नसतो, फडणवीसांचे दानवेंच्या ट्विटला प्रत्युत्तर..

एक पोलिस (Police) कर्मचारी (काळा -पांढरा रंगाचा टी शर्ट घातलेला फोटोमध्ये दिसत आहे) स्वतः कोंबड्यांची झुंज लावता दिसत आहे. तर इतर ३ पोलिस कर्मचारी ही कोंबड्यांची झुंड पाहण्यात दंग झालेले दिसतात. दरम्यान याच्या व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भंडारा (Bhandara) पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे कर्दनकाळ ठरलेले पोलिस अधीक्षक लोहित मतानी या पोलिस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com