येईल मुठीत तुझ्याही आभाळ.. ; प्रफुल्ल पटेलांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी

Bhandara Politics| Prafulla Patel news| राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतरही ईडीची पिडा नेत्यांच्या मागे कायम आहे.
Prafulla Patel news|
Prafulla Patel news|

भंडारा : राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतरही ईडीची पिडा नेत्यांच्या मागे कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या मुंबईतील घर जप्त करत ईडीने (ED) कारवाई केली. इक्बाल मिर्ची प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात सध्या खळबळ उडाली आहे. मात्र पटेल यांच्या भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी "हिम्मत ठेवा भाईजी देव तुमच्या पाठीशी आहे" अशी बॅनरबाजी लावून धीर दिला आहे.

लहानपणापासूनच प्रफुल्ल पटेल यांची नाळ भंडारा गोंदिया जिल्ह्याशी जोडली गेली आहे. दोन्ही जिल्ह्यात त्यांचे समर्थक आहेत. भंडाऱ्यातील तुमसर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व प्रफुल पटेल यांचे समर्थक सागर गभने यांनी हे पोस्टर लावले आहे. ''भाजप सरकारने ईडी आणि दबावतंत्राचा वापर करुन वाघाला पिंजऱ्यात अडकवण्याचा निष्फळ प्रयत्न केला आहे. पण ज्याला देव तारी त्याला कोण मारी. हिम्मत ठेवा भाईजी देव तुमच्या पाठीशी आहे. आम्ही भंडारा गोंदिया जिल्ह्याचे नागरिक तुमच्या पाठिशी आहोत,'' असा मजकूर या पोस्टरवर लिहीण्यात आला आहे.

Prafulla Patel news|
'...तेव्हा पवारसाहेब, अजितदादा मार्गदर्शक असतीलच; पण निर्णय नवीन पिढी घेईल...'

त्याचबरोबर, 'रेडू' या मराठी सिनेमातील गाण्याच्या ओळी 'होईन पुनव मनाशी जागव खचून जाऊ नको, येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको... उगाच भयाण वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको देवाक काळजी रे, माझ्या देवाक काळजी रे' अशा ओळी बॅनरवर छापून प्रफुल पटेल यांना भावनिक समर्थन दर्शविणारे शहरात बॅनर लावले.

- काय आहे प्रकरण ?

इक्बाल मिर्ची प्रकरणात २०२१ मध्ये पटेल यांची चौकशी झाली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई आहे. या सीजे हॅाऊसमध्ये पटेल यांची गुंतवणूक असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॅाऊसच्या मागे प्रफुल्ल पटेल यांचे घर आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणात ईडी विविध धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न करत आहे.

मुंबईत इक्बाल मिर्ची व त्याच्या कुटुंबीयांच्या पाच मालमत्ता असल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यातील दोन मालमत्ता मेसर्स सनब्लिंग रिऍल्टर्स आणि मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. यांना विकण्यात आल्या आहे. वरळीतील मालमत्ता 2011 मध्ये सनब्लिंग रिऍल्टर्सला विकण्यात आली होती. मिर्ची व मिलेनियम डेव्हलपर्स यांनी संयुक्तपणे सीजे हाऊस ही 15 मजल्यांची इमारत 2007 मध्ये बांधली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील 14 हजार चौरस फुटांची मालमत्ता 2007 मध्ये मिरची कुटुंबीयांच्या नावावर करण्यात आली.

दाऊद इब्राहिम टोळीचा अमली पदार्थांचा व्यवसाय सांभाळणाऱ्या मिर्चीला पकडण्यासाठी इंटरपोलने नोटीस जारी केली होती. अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात 1988 पासून मुंबई पोलिसांना हव्या असलेल्या मिर्चीने 1995 मध्ये भारतातून पलायन केले. भायखळा येथे त्याच्या कुटुंबीयांचा मिर्ची विकण्याचा व्यवसाय होता. त्यामुळेच त्याला गुन्हेगारी जगतात "मिर्ची' हे टोपणनाव मिळाले. प्रामुख्याने मॅण्ड्रेक्‍स गोळ्यांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मिर्चीने दुबईत साम्राज्य निर्माण केले होते. 14 ऑगस्ट 2013 रोजी त्याचा लंडनमध्ये मृत्यू झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com