Bhandara District News : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील कट्टर विरोधक दादा-भाऊ एकाच मंचावर, ‘हे’ आहे कारण...

Nana Patole : श्री गुरुदेव सेवाश्रमाच्या इमारतीचे लोकार्पण नाना पटोलेंच्या हस्ते झाले.
Dr.  Parinay Fuke and Nana Patole on same stage.
Dr. Parinay Fuke and Nana Patole on same stage.Sarkarnama

Politics of Bhandara-Gondia District : भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणातील दोन नेते. एक दादा तर दुसरे भाऊ या नावाने ओळखले जातात. २०१९ला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढले. तुल्यबळ लढत झाली. त्यात भाऊ निवडून आले. आज सायंकाळी (ता. १६) हे दोन नेते एका कार्यक्रमात एकाच मंचावर आले, अन् अनेकांच्या भुवया उंचावल्या. (These two leaders appeared on the same stage in an event)

निमित्त होते लाखांदूर येथील श्री गुरूदेव सेवाश्रमाच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचे. यासाठी हे दोन दिग्गज नेते एका मंचावर आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे आमदार नाना पटोले (भाऊ) यांनी उपलब्ध करून दिलेल्या एक कोटीच्या निधीतून बांधकाम करण्यात आलेल्या श्री गुरुदेव सेवाश्रमाच्या इमारतीचे लोकार्पण नाना पटोलेंच्या हस्ते झाले. यावेळी भाजप नेते, माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके (दादा) उपस्थित होते.

नगराध्यक्ष विनोद ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वसंत इंचिलवार व अन्य मान्यवर मंचावर होते. माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी २०१९ची निवडणूक जिंकण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण त्यावेळी नाना पटोले यांनी बाजी मारली. त्या निवडणुकीत पराभव होऊनही नाना पटोले यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याच्या विरोधात लढल्याचे बक्षीस डॉ. फुकेंना राज्यमंत्रिपदाच्या रुपात मिळाले. मंत्रिपदाचा उपयोग त्यांनी भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपले नेटवर्क वाढवण्यासाठी केला.

२०२४मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा डॉ. परिणय फुके (Dr. Parinay Fuke) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यात टक्कर होण्याची शक्यता आहे. पण तोपर्यंत राजकारणाची हवा बदलली तर जिल्हावासीयांना हा रोमहर्षक सामना बघता येणार नाही. कारण डॉ. फुके यांचे प्रमोशन करून त्यांना भंडारा-गोंदिया लोकसभा लढण्याचा आदेश भाजप देऊ शकते, अशी एक माहिती आहे. नाना पटोलेसुद्धा साकोली विधानसभाच लढतील की २०१९प्रमाणे नागपूर लोकसभा लढतील, हे अद्याप ठरलेले नाही. या दोन्ही शक्यता फोल ठरल्यास जिल्हावासीयांना दादा-भाऊंमधील सामना पुन्हा बघता येणार आहे.

Dr.  Parinay Fuke and Nana Patole on same stage.
Sangram Kote Vs Nilesh Rane: 'राणेंनी जो बाइडन सोडून सर्वांवरच टीका केली आहे'

नुकत्याच झालेल्या लाखांदूर बाजार समितीच्या निवडणुकीत (Election) काँग्रेस (Congress) समर्थीत पॅनलला ११ तर (BJP) भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थीत पॅनलला सात जागा मिळाल्या. येत्या २३ मे रोजी सभापतिपदाची निवडणूक होणार आहे. लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदासाठी घोडेबाजाराला उधाण आले आहे. लाखांदूर बाजार समितीच्या सभापतिपदासाठीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाऊ व दादा एकाच मंचावर आल्याने दोन्ही पॅनलच्या नवनियुक्त संचालकांमध्ये राजकीय कुजबुज कार्यक्रमादरम्यानच सुरू होती.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com