भंडारा विभागाचे उत्पन्न केवळ ३२ हजार, एसटी विकण्याची वेळ येणार?

केवल एकच बस (Only one bus) सुरू करता आली असून ३६७ पैकी ३६६ बसेस अद्याप ही आगारात उभ्या आहेत. येत्या काही महिन्यांत संप मागे न घेतल्यास एसटी विकण्याची वेळ येईल.
S.T. Bus
S.T. BusSarkarnama

भंडारा : एसटी कर्मचाऱ्यांचा (S.T. Employee) संप मिटण्याचे नाव घेत नाहीये. विलीनीकरणाच्या मागणीवरून परिस्थिती चिघळत चालली आहे. अशा परिस्थितीत भंडारा (Bhandara) एसटी विभागाने प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या ६ दिवसांत केवळ ३२ हजार ६११ रुपयांचेच उत्पन्न झाले आहे. यातून डिझेलचा खर्च (Diesel costs) वजा केल्यास नफा केवळ १८ हजार ९११ रुपयांचा आहे.

परिस्थिती अशीच चिघळत गेली तर एसटी विकण्याची वेळ येण्याची शक्यता बळावली आहे. महिन्याभरापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने भंडारा विभागाचे नुकसान कोटीच्या घरात गेले आहे. भंडारा एसटी विभाग आर्थिक नुकसानाच्या दलदलीत अधिकच फसत चालला आहे. यातून बाहेर निघण्याच्या प्रयत्नात भंडारा विभागाने धाडसी निर्णय घेत साकोली आगारातून बससेवा सुरू करण्याच्या निर्णय घेतला. साकोली आगारातून सुटलेल्या बसेसद्वारे 6 दिवसांत भंडारा एस टी विभागाला केवल ३३ हजार ६११ रुपयांचे तुटपुंजे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे या ६ दिवसांत केवळ ६८४ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

बसेसने केवळ ८६० किलोमीटर प्रवास केला आहे. या ६ दिवसांत बसेसला १३ हजार ७०० रुपयाच्या डिझेलचा खर्च आला असून खर्च वजा करता केवळ १८ हजार ९११ रुपयांचा नफा झाला आहे. जो भंडारा विभागासाठी अतिशय तुटपुंजा आहे. महिन्याभरापासून सुरू असलेला संप मिटवण्यासाठी राज्य सरकारने साम - दाम- दंड - भेद नीतीच्या वापर सुरू केला असून आत्तापर्यंत १९८ संपकरी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

S.T. Bus
राजकीय पुढाऱ्यांकडून एसटी संपाचे श्रेय लाटण्याचे प्रकार : अनिल परब

८६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तर भंडारा एसटी विभागातील ६ आगारांपैकी केवळ साकोली आगारातून बससेवा सुरू करण्यात यश मिळाले आहे. तर भंडारा विभागातील १८३५ कर्मचाऱ्यांपैकी १४९९ कर्मचारी अद्यापही संपात सहभागी आहेत. केवल एकच बस सुरू करता आली असून ३६७ पैकी ३६६ बसेस अद्याप ही आगारात उभ्या आहेत. येत्या काही महिन्यांत संप मागे न घेतल्यास एसटी विकण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com