Prafull Patel, Parinay Fuke and Nana Patole
Prafull Patel, Parinay Fuke and Nana PatoleSarkarnama

Bhandara APMC Election : भंडाऱ्यात भाजपची पुन्हा राष्ट्रवादीसोबत युती, फडणवीसांच्या ‘त्या’ वाक्याची झाली आठवण !

Bhandara : भंडारा जिल्ह्यातील सात बाजार समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.

Bhandara District APMC Election : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गोंदिया जिल्हा परिषदेच्या धरतीवर भाजपने आपला राजकीय शत्रू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करीत युती केली. त्यामुळे उलटसुलट राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (There has been an uproar of political debates)

या युतीचे परिणाम भविष्यात होणाऱ्या नगर परिषद, लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांवर होणार का? नवीन राजकीय समीकरणं जुळून येतील का, असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील सात बाजार समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यातील भंडारा, पवनी, साकोली, पवनी, मोहाडी, तुमसर, लाखनी या सात बाजार समितीच्या होऊ घातल्या आहेत.

तुमसर बाजार समिती निवडणुकीवर न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्याने आता केवळ सहा बाजार समितीची निवडणूक होणार आहे. दरम्यान निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. सहकार क्षेत्रावर पकड मजबूत ठेवण्यासाठी ही निवडणूक सर्व राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. येत्या ३० एप्रिलला जिल्ह्यातील मतदान होणार आहे.

काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेप्रमाणे भाजपने आपला राजकीय शत्रू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करीत पुन्हा एकदा जोरदार काँग्रेसला धक्का दिला आहे. त्यामुळे विचित्र युतीने जिल्ह्यातील राजकारणाचे समीकरण बदलले आहे. एकापाठोपाठ एक निवडणुकांमध्ये भाजपची राष्ट्रवादीशी हातमिळवणी राजकारणाची दिशा बदलण्याचे संकेत देत आहेत.

Prafull Patel, Parinay Fuke and Nana Patole
Bhandara-Gondia LokSabha : परंपरा सुरु राहणार की इतिहास घडणार; भाजपमध्ये अनेक इच्छुक : पटोलेंची भूमिका महत्त्वाची

मागे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हेवीवेट नेते प्रफुल्ल पटेल यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांना त्यांनी निमंत्रित केले होते. त्यानुसार फडणवीस आलेही होते. भाषणात ‘बात निकली है तो दूर तक जायेगी...’, असे म्हणत त्यांनीही काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न तेव्हा केला होता. आता गोंदियानंतर आता भंडाऱ्यात पुन्हा भाजपची राष्ट्रवादीशी झालेली युती ही लोकसभा आणि विधानसभेचे राजकारण बदलवणारी तर ठरणार नाही ना, असे वाटू लागले आहे.

या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मोठा धक्का असल्याचे समजण्यात येते. मात्र त्यांनी या निवडणुकीत कंबर कसली असून ‘एकला चलो रे’चा नारा देत निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात त्यांचे दौरेसुद्धा वाढले आहेत.

Prafull Patel, Parinay Fuke and Nana Patole
Bhandara : जातीय सलोखा निर्माण करणारा ठरला राज्य सरकारचा ‘हा’ निर्णय !

ही सर्व घडामोड बघता राजकारणात कधी काय घडेल, याचा नेम नाही. आता गोंदिया (Gondia) पाठोपाठ भंडाऱ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा पॅटर्न बघायला मिळाला. भाजपने राष्ट्रवादीसोबत घरोबा करीत, काँग्रेसलाच 'हात' दाखविला. त्यामुळे नाना पटोले चांगलेच संतापलेले असल्याची माहिती आहे.

क्रिकेट आणि राजकारणात (Politics) कधीही काहीही होऊ शकते. तसेच कुणीच कुणाचा कायम वैरी नसतो, हेदेखील बरेचदा सिद्ध झाले आहे. सत्तेच्या समीकरणासाठी राजकारणी वेळेवर कसलीही तडजोड करू शकतात. याचेच उदाहरण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या (APMC Election) माध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात होऊ घातलेल्या विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत नेते (Leaders) काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com