भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेंच्या निवडणुका जाहीर

नामनिर्देशनपत्रे 1 ते 6 डिसेंबर दरम्यान स्वीकारले जाणार आहेत.
भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेंच्या निवडणुका जाहीर
Bhandara&Gondiya Z.P ElectionSarkarnama

मुंबई : भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा तसेच, व त्या अंतर्गत येणाऱ्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (Bhandara&Gondiya Z.P Election-2021) 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान आणि 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

Bhandara&Gondiya Z.P Election
बिनविरोधच्या लाटेतही बावनकुळे लटकले! नागपुरात काँग्रेसशी थेट लढत

भंडारा जिल्हा परिषदेच्या 52 आणि त्या अंतर्गतच्या 7 पंचायत समित्यांच्या 104, तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या 53 आणि त्याअंतर्गतच्या 8 पंचायत समित्यांच्या 106 जागांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. संबंधित ठिकाणी आजपासून (ता.26 नोव्हेंबर) आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील.

Bhandara&Gondiya Z.P Election
काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे : मुंबई, विदर्भातील दोन मंत्र्यांना मिळणार डच्चू?

नामनिर्देशनपत्रे 1 ते 6 डिसेंबर दरम्यान स्वीकारले जातील. 5 डिसेंबर रोजी सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. तसेच, 7 डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. मतदान 21 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

निवडणुका होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची नावामध्ये भंडारा जिल्ह्यातील पंचायत समित्यामध्ये तुमसर, मोहाडी, भंडारा, साकोली, लाखनी, पवनी आणि लाखांदूर तर, गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समित्यामध्ये- गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, सडकअर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी आदींचा समावेश आहे.

हेही वाचा : मोदींची दाढी आहे, तोपर्यंत घर मिळत राहील ; भाजप खासदाराचे अजब विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाढीबाबत वादग्रस्त विधान केल्यानं मध्यप्रदेशातील रीवा येथील भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. जनार्दन मिश्रा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाढीमध्ये अनेक घरं आहेत. त्यांनी एक वेळा जरी दाढी हलवली तर ५० लाख घरं पडतात,''असे वादग्रस्त विधान जनार्दन मिश्रा यांनी केलं आहे. ते सुकुवर जैसवली वस्ती येथील रस्ता भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. एका जाहीर सभेत त्यांनी हे अजब विधान केलं आहे.

'पंतप्रधान आवास' योजनेअंतर्गत अनेकांना घर मिळालं. त्यामुळे जोपर्यंत मोदींची दाढी आहे , तोपर्यंत 'पंतप्रधान आवास' या लाभ मिळत राहिल. त्यामुळे तुम्ही मोदींच्या दाढीकडे पाहत राहा, तुम्हाला घर मिळत राहिल. मोदींची दाढी ही अमर आहे, तुमचे घर ही अमर होईल. त्यामुळे मोदींची दाढी पाहत राहा, घर मिळत राहतील.'' असे जनार्दन मिश्रा म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in