Bhagwat Karad News : 'विदर्भ व मराठवाड्यासाठी समृद्धी महामार्ग फडणवीसांची देणगी!'

Bhagwat Karad News : केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड सिंदखेडराजा येथे बोलत होते
 Devendra Fadnavis, Bhagwat Karad
Devendra Fadnavis, Bhagwat KaradSarkarnama

सिंदखेड राजा : विदर्भ व मराठवाड्यासाठी समृद्धी महामार्ग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देणगी असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) व्यक्त केले. सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा या ठिकाणी त्यांनी भेट दिली, त्यावेळी त्यांनी 'सरकारनामा'शी संवास साधला. (Bhagwat Karad News)

कराड हे औरंगाबाद वरून हिंगोली ला जात असताना तालुक्यातील किनगाव राजा येथील डॉ. शिवानंद जायभाये यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. कराड यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजप (BJP) नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नागपूर वरून निघून शिर्डीपर्यंत समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.

 Devendra Fadnavis, Bhagwat Karad
मुंढे अजुनही वेटिंगवरच; मुख्यमंत्री शिंदेंनी आणले, मंत्री सावंत अन् डॉक्टरांच्या लॉबिने घालवले?

फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्ग होता, समृद्धी महामार्ग २० जिल्ह्यांमधून जातो तसेच विदर्भ व मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे हे महत्त्वाचे योगदान आहे. या महामार्गामुळे समृद्धी महामार्गाच्या परिसराचा विकास होणारच आहे, समृद्धी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलेले आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे काम व कर्तुत्व मोठे होते, त्यामुळे समृद्धी महामार्गाला दिलेले नाव सुद्धा हे चांगले आहे. समृद्धी महामार्ग सुरू होत असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भासाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई किंवा नागपूरला जाण्यासाठी नागरिकांना चांगला महामार्ग मिळालेला आहे.

 Devendra Fadnavis, Bhagwat Karad
Samruddhi Mahamarg : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची नागपूर ते शिर्डीपर्यंत ट्रायल घेणार!

त्यामुळे दळणवळणाची चांगली सोय झालेली आहे, त्यामुळे व्यापार वाढणार आहे, असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या जीवनामध्ये समृद्धी येण्यास सुरुवात होणार आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या वेळी डॉ. शिवानंद जायभाये, नंदकिशोर मांटे, शिवाजीराव काळुसे, सुभाषराव घिके, खुशालराव नागरे, डॉ. ज्ञानेश्वर पातुरकर, दीपक पडुळकर, भरत जायभाये यांच्यासह आदी जण उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com