महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने कॉंग्रेसला दिला ‘हा’ इशारा...

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) कायम स्वबळाची भाषा करीत असतात. त्याला प्रत्युत्तर म्हणून पटेल (Prafull Patel NCP) यांनीही स्वबळाची भाषा करीत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला आहे.
Prafull Patel and Nana Patole

Prafull Patel and Nana Patole

Sarkarnama

नागपूर : ‘आम्ही आता मोठा भाऊ आहोत’, असे गेल्या वर्षी म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल्ल पटेल (Prafull Patel) यांनी नागपुरात जोरदार संघटन सुरू केले होते. तीच बांधणी कायम ठेवत ते आता महानगरपालिका निवडणुकीसाठी आक्रमक झाले आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) कायम स्वबळाची भाषा करीत असतात. त्याला प्रत्युत्तर म्हणून पटेल यांनीही स्वबळाची भाषा करीत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला आहे.

काल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गणेशपेठ येथील कार्यालयात कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी पटेल म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी आहे हे विसरून जा. महापालिका निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ती आपल्याला आपल्याच ताकदीवर जिंकायची आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल्ल पटेल यांनी आम्हीसुद्धा स्वबळासाठी सज्ज असल्याचा इशारा काँग्रेसला दिला. बैठकीला पटेल यांच्यासह शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी मंत्री रमेश बंग, शहर निरीक्षक राजेंद्र जैन, सुबोध मोहिते, शब्बीर अहमद विद्रोही, प्रकाश गजभिये, दीनानाथ पडोळे, प्रवीण कुंटे पाटील, अनिल अहीरकर, आभा पांडे, सलील देशमुख, प्रशांत पवार, वर्षा शामकुळे, जावेद हबीब, दिलीप पनकुले, बजरंग सिंह परिहार, शेखर सावरबांधे, रमेश फुले आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रफुल्ल पटेल यांनी महापालिकेची निवडणूक आपल्याला आपल्याच बळावरच लढायची असल्याचे सांगितले. त्यामुळे आता कुणाच्या सहकार्याची अपेक्षा बाळगू नका आणि गाफील राहू नका. सर्वच प्रभागांसाठी तुल्यबळ उमेदवार शोधून ठेवा. प्रत्येकाला संधी मिळणार असल्याने आपसात बसून पॅनेल तयार करा, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिला. राज्यात महाविकास आघाडी असली तरी स्थानिक निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार सांगत आहेत. त्यामुळे आपणही आपल्या ताकदीवर निवडणूक लढण्यासाठी सज्ज राहावे. आपआपले प्रभाग निश्चित करून जनसंपर्क वाढवा, नागरिकांच्या समस्या जाणून घ्या, अशा सूचनाही यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी केल्या. महापालिकेच्या निवडणुकीतील यश आपल्यासाठी विधानसभेचे दार उघडून देणार आहे. त्याकरिता राष्ट्रवादीच्या अधिकाधिक जागा निवडून आणाव्या, असेही पटेल म्हणाले. रमेश बंग यांनीसुद्धा तयारीला लागण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली.

<div class="paragraphs"><p>Prafull Patel and Nana Patole</p></div>
पवारांना मोदींचा 'स्लो डाऊन'चा सल्ला अन् प्रफुल्ल पटेलांचा हजरजबाबीपणा

हजार फुटांची घरे करमुक्त करा..

मुंबईत पाचशे चौरस फुटांच्या इमारती करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. तेथील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. नागपूरमध्ये हजार चौरस फुटांच्या जागेवर गोरगरीब व मध्यमवर्गीयांची घरे आहेत. त्यामुळे करमाफी देताना नागपूर शहरासाठी हजार चौरस फुटाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी दुनेश्वर पेठे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com