Bawankule : मूल होत नाही तेव्हा, दुसऱ्याचं मूल आणून बारसं केलं जातं; ठाकरेंचं तसंच आहे !

Uddhav Thackeray : एवढे दिवस सत्ता गाजवली. तेव्हा नामांतराचा विचार केला नाही.
Uddhav Thackeray, Aditya Thackeray and Chandrashekhar Bawankule
Uddhav Thackeray, Aditya Thackeray and Chandrashekhar BawankuleSarkarnama

Chandrashekhar Bawankule in Nagpur : जेव्हा देवेंद्र फडणवीस बोलतात ते विचारपूर्वक बोलतात पुराव्यानिशी बोलतात. ते काही बोलायचं म्हणून बोलत नाहीत आणि संभ्रम निर्माण करत नाही. ते असत्य ही कधीच बोलत नाहीत. जे काही ते बोलले आहेत, ते सत्यच आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आज दुपारी नागपुरात आले असता, विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, एखाद्या कुटुंबात जेव्हा मूल होत नाही. तेव्हा दुसऱ्याचा मूल आणून बारसं केलं जातं. संभाजीनगर आणि धाराशिव या नामांतराबद्दल ठाकरे गटाचं तसंच आहे. एवढे दिवस सत्ता गाजवली. तेव्हा नामांतराचा विचार केला नाही. मात्र सत्ता जात असताना अल्पमतात असताना कॅबिनेटमध्ये देखावा केला.

अजित पवारांना भिती वाटते..

संभाजीनगर अशा नामांतराला एमआयएमचा आधीपासूनच विरोध होता. त्यांनी कितीही आंदोलने केली, तरी काही फरक पडत नाही. संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर व्हायलाच पाहिजे होते. एवढ्या वर्षानंतर हा लढा संपला असून जनतेची इच्छा पूर्ण झाली आहे, असे सांगताना आमदार बावनकुळे यांनी अजित पवारांवरही टिका केली. आपले नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये जाऊ नये, अशी भीती दादांना आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) मध्यावधीची भाषा बोलत असल्याचे ते म्हणाले.

ठाकरे ओवेसींकडे जातील..

ओवेसी जर उद्धव ठाकरेंकडे जाणार नसतील, तर ओवेसींकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जातील. ज्या समाजवादी पक्षाने रामचरित मानस जाळलं, त्या सपाचे नेते उद्धव ठाकरेंना भेटायला गेले आहे. उद्धव ठाकरेंना काय म्हणावं? उद्धव ठाकरेंनी किती खालची पातळी गाठली आहे. मी शंभर टक्के सांगतो, ओवेसी जरी यांच्याकडे नाही आले, तरी हे ओवेसीकडे जातीलच. उद्धव ठाकरे यांची एवढी वाईट स्थिती होईल, असा महाराष्ट्राने कधी विचारही केला नव्हता. सत्तेच्या लालसेपायी उद्धव ठाकरे ओवेसीकडे जातील, असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.

Uddhav Thackeray, Aditya Thackeray and Chandrashekhar Bawankule
Bawankule : सात न्यायाधीशांकडे का जायचे आहे? उद्धव यांनी न्यायालयाचा निर्णय मान्य करावा !

जे ५० आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेले, त्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. कारण त्यांना भिती वाटत होती की, उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये राहिलो, तर पुढील निवडणूक जिंकणार नाही. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला. उद्धव ठाकरेंचे फक्त ३० आमदार निवडून आले असते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या आमदारांची संख्या १०० पर्यंत वाढवली असती. हे सर्व चित्र दिसत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तो निर्णय घेतल्याचेही आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in