Chandrasekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ पंजात आहे !

एक मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी उद्भव ठाकरे यांनी संपूर्ण पक्षाचे नुकसान केल्याचे बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) सांगितले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

भंडारा : निवडणूक आयोग, दिल्ली कोर्ट स्वायत्त संस्था असून त्यांना कोणीही प्रभावित करू शकत नाही, असे परखड मत भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. पक्ष नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने निकाल देण्यास घाई केल्याच्या आरोप करत ठाकरे दिल्ली कोर्टात गेले आहेत. त्याबाबत बोलताना आमदार बावनकुळेंनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मिळालेले चिन्ह मशाल हे पंजा म्हणजे कॉंग्रेसच्या (Congress) हातात आहे. त्यामुळे ही मशाल काही पेटणार नाही, अशी टिका बावनकुळे यांनी केली. सद्यस्थितीतही ठाकरे यांची मशाल काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) आश्रयाने पेटली आहे. एक मुख्यमंत्रिपद मिळविण्यासाठी ठाकरेंनी पक्षाचे नुकसान केले. काल निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिल्यानंतर आज ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी एक मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी उद्भव ठाकरे यांनी संपूर्ण पक्षाचे नुकसान केल्याचे बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) सांगितले.

तुम्ही हिदुत्वाचे विचार सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीचे विचार स्वीकारल्याने तुमची मशाल पेटणार नसल्याची तिखट प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्या अडीच वर्षाचा राज्यकारभार लोकांनी बघितला. बिघडलेले हिंदुत्व लोकांनी बघितले. आता पंजा पर्यायाने काँग्रेसच्या हातात मशाल देऊन उद्भव ठाकरे यांनी पुन्हा स्वतःचे प्रचंड नुकसान केल्याचे बावनकुळे म्हणाले. ठाकरे गट व शिंदे गटातील वाद हा त्या दोघांमधील आहे. त्या वादात आम्ही पडणार नाही. दिल्ली कोर्ट काहीही निर्णय देऊ देत. काही झाले तरी भाजप आणि शिंदे यांची युती कायम असणार आहे. आम्ही एकनाथ शिंदे गडासोबत सोबत कायम राहणार असल्याचे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.

Chandrashekhar Bawankule
भाजप-मनसे युतीबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

सामना आग ओकण्याचे काम करतोय..

उद्धव ठाकरेंचा ‘सामना’ आग ओकण्याचे काम करत आहे. संघचालक बाळासाहेब देवरसांचा शिंदे गटाच्या नावाशी काय संबंध, असा सवाल आमदार बावनकुळे यांनी उपस्थित केला. त्यांचा आरोप पूर्णतः खोटा असल्याचेही ते म्हणाले. तुम्ही आपल्या खासदार, आमदारांना भेटत राहिले असते. तर ही परिस्थिती आली नसती. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन मर्द मराठा एकनाथ शिंदे बाहेर निघाले आहेत. राष्ट्रवादी-काँग्रेस सोबत युती करून ठाकरेंनी आपल्या आमदारांना अडचणीत आणले. म्हणून एकनाथ शिंदे बाहेर निघाल्याचेही आमदार बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com