Bawankule : बावनकुळे म्हणाले, समृद्धी कोण रोखत होते, हे एकनाथ शिंदेंना ठाऊक आहे...

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या समृद्धी आणि मेट्रो रेल्वेच्या उद्‍घाटनासाठी नागपुरात येत आहेत.
Chandrashekhar Bawankule and Eknath Shinde
Chandrashekhar Bawankule and Eknath ShindeSarkarnama

समृद्धी महामार्ग तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. त्यांच्याच कार्यकाळात या मार्गाचे काम सुरू झाले होते. त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने समृद्धी महामार्गाचे काम रोखण्याचे बरेच प्रयत्न केले. हे प्रयत्न कुणी केले, हे मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच ठाऊक आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या समृद्धी आणि मेट्रो रेल्वेच्या (Metro Railway) उद्‍घाटनासाठी नागपुरात (Nagpur) येत आहेत. उद्याच्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी आपल्या दौऱ्यात आणखी काही मोठ्या घोषणा करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण वैदर्भीयांनी (Vidarbha) त्यांच्या स्वागतासाठी स्वयंस्फूर्तीने यावे, असे आवाहनही आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी केले आहे.

काँग्रेसने आजवर विदर्भाची उपेक्षाच केली. नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला. करार आणि घोषणा केल्या. मात्र दिले काहीच नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकारच येताच नागपूर तसेच विदर्भात विकासाची गंगा वाहू लागली आहे. मोदी, गडकरी आणि फडणवीस यांच्यामुळे विदर्भाला अच्छे दिन आले आहेत. समृद्धी महामार्गाने संपूर्ण महाराष्ट्र विदर्भाशी जोडला जाणार आहे. हा मार्ग होऊ नये, याकरिता महाविकास आघाडीच्या कार्यकाळात बरेच प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते चांगले ठाऊक असल्याचे यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule and Eknath Shinde
Bawankule : बावनकुळे म्हणाले, आदित्य म्हणजे सोन्याच्या चमचाने दूध प्यालेलं बाळ...

समृद्धी महामार्गाला भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे भविष्यात जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या भागांत उद्योग येतील आणि येथील धान व इतर शेतमाल मुंबईत जाणे सोयीचे होईल. त्यामुळे भंडारा व गोंदियातही समृद्धी येणार आहे. उद्योजकांनाही कनेक्टिव्हीटी मिळणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रात उद्योग स्थापन करण्यासाठी खर्चात बचत होईल, असा दावाही यावेळी बावनकुळे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com