Chandrashekhar Bawankule News: राहुल गांधी काय बोलतात, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही; मी काय सांगणार?

Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi: केवळ तक्रार दिल्याने होत नाही, तर त्याचे पुरावे द्यावे लागतात.
Chandrashekhar Bawankule - Rahul Gandhi
Chandrashekhar Bawankule - Rahul GandhiRahul Gandhi

Nagpur News: मनीष सिसोदिया यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यावरून विरोधक अकांडतांडव करीत आहे. मुळात त्यांची काही एक गरज नाही. आमच्या पक्षातही कितीतरी चौकश्‍या झाल्या. माझीसुद्धा चौकशी झाली आहे. पण आम्ही असं नाही केलं. निमूटपणे चौकशीला सामोरे गेलो आणि तपास यंत्रणेला सहकार्य केले, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

नागपुरात पत्रकारांशी बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, जेव्हा जेव्हा तक्रारी होतात आणि पुरावे असतात, तेव्हा प्रत्येकाची चौकशी होत असते. त्यामुळे केवळ तक्रार दिल्याने होत नाही, तर त्याचे पुरावे द्यावे लागतात. यंत्रणेला पुरावे दिले तर आमचीही चौकशी होऊ शकते. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. सच्चे असतील, तर ते निमूटपणे चौकशीला सामोरे जातील आणि दोषी नसतील, तर सुखरूप बाहेरही पडतील.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दल विचारले असता, राहुल गांधी काय बोलतात, ते त्यांचं त्यांनाच कळत नाही. त्यांच्या भाषणातले मुद्दे काय असतात, तेही कळत नाही. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे, हे मलाही कळत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, असा प्रतिप्रश्‍न आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

सरकार आल्यानंतर किंवा सरकार नसताना दोन्ही वेळी जर आंदोलन करून न्याय मिळत नसेल. त्यामुळे आंदोलनात आमचे प्रतिनिधी गेले तर काही फरक पडत नाही. गोपीचंद पडळकर यांनी एसटीच्या आंदोलनात जावे, यात काही नवीन नाही. सरकारचे लक्ष वेधणे हे आमदाराचं कामच आहे, असेही ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule - Rahul Gandhi
BJP News : प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे, असं बावनकुळे का म्हणाले..

सावरकरांचा इतिहास वाचला असेल, तर चार ओळी वाचल्यावर आपल्या डोळ्यात अश्रू येतात आणि त्यांच्या नावावरून घाणेरडे राजकारण (politics) केले जात आहे. राजकारणासाठी लोकांचा स्तर एवढा खाली गेला आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेवर आणि इतिहासावर वक्तव्य करायला लागले आहेत. यांनी खालची पातळी गाठली आहे. यापेक्षा खालची पातळी राजकारणात असू शकत नाही. सावरकरांच्या इतिहासाबद्दल यांना काही माहिती नाही, असा आरोप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com