Chandrashekhar Bawankule : पटोलेंनी आधी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांना खरं काय ते विचारावं !

Uddhav Thackeray : सावरकर यांचा अपमान होत असताना सरकार जाईल म्हणून तोंडाला पट्टी बांधली.
Chandrashekhar Bawankule and Nana Patole.
Chandrashekhar Bawankule and Nana Patole.Sarkarnama

Chandrashekhar Bawankule News : बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. उद्धव ठाकरे यांनी मात्र हिंदुत्व तोडून पाठीत खंजीर खुपसला. आता मात्र त्यांना चूक लक्षात आली आहे. माझी चूक झाली, असे वाटणे हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

पण आता त्यांना बोलता येत नाही, अशी परिस्थिती आहे. युती तोडून काँग्रेसची विचारधारा स्वीकारली. सावरकर यांचा अपमान होत असताना सरकार जाईल म्हणून तोंडाला पट्टी बांधली. आता हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही गमावला आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

निवडणुका या लागणारच आहेत, ते कोणाच्या हाती नाही. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणुका लागणार आहेत. आम्ही निवडणुकांना घाबरत नाही. मोदींच्या नेतृत्वात निवडणुका लढवू आणि जिंकुसुद्धा. उद्धव ठाकरे यांच्या गरळ ओकण्याला जनता धडा शिकवेल. केव्हाही निवडणुका होऊ द्या, आम्ही त्यासाठी तयार आहोत.

उद्धव ठाकरे यांचा जवळचे ५० आमदार निघून गेले. राज्यपालांना सांविधानिक पद्धतीनं नियमात राहून काम केले. पण महविकास आघाडीचे सरकार गेल्यानं त्यांना दुःख झालं आहे. नियमबाह्य काम राज्यपालांनी होऊ दिला नाही. अतिशय उत्तम काम केले. शिवनेरी किल्यावर जाऊन दर्शन घेतलं. विकास कामामध्ये छत्रपती शिवरायांचा उल्लेख केला. शिवाजी महाराजांची प्रेरणा मानून राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी काम केले. एका वक्तव्यामुळे राज्यपालांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता येत नाही. ते महाराष्ट्राला ऊर्जा देणारे होते, असे आमदार बावनकुळे यांनी सांगितले.

अनिल देशमुख यांना फक्त जामीन मिळाला आहे. नागपुरात येण्याची परवानगी मिळाली. कोर्टाचा निकाल लागेल. त्यांनी जल्लोष करावा की नाही, हा त्यांचा प्रश्न. जनतेच्या कोर्टात ते घटनापिठाचे आरोपी आहेत. निकाल लागत नाही तोपर्यंत ते आरोपी आहेत. जल्लोष करून खूप काही मिळवलं असं होत नाही, जनता योग्य निर्णय करेल.

Chandrashekhar Bawankule and Nana Patole.
BJP News : प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे, असं बावनकुळे का म्हणाले..

शिवसेनेचे नेते म्हणतात नाना पटोलेंमुळे सरकार पडलं. पटोले म्हणतात कोश्यारीमुळे सरकार पडलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलं आहे की, पटोलेंनी अध्यक्षपद सोडल्यानं सरकार पडलं. पटोले यांनी पहिले राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांना खरं काय ते विचारावं, असा सवाल बावनकुळे यांनी केला. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर कोणीही बोलू नये.

जो निकाल येईल, तो मान्य करायला पाहिजे. जो निकाल येईल, तो मान्य करू. उद्धव ठाकरे हे निकाल लागण्यापूर्वी निकाल लागल्याची भाषा करत आहेत. किंचित सेनेचे लोक सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने आला, तर योग्य असे म्हणतात. विरोधात गेला तर टीका करायला तयार होतात, हे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला.

बोहरा समाजाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहानपणापासून प्रेम आहे. ते त्यांच्या रक्तात आहे. गुजरात प्रवासामध्ये बोहरा समाजासोबत त्यांनी वेळ घालवला आहे. मुस्लिमांना भेटल्यामुळे हिंदुत्व जातं असं कोणी म्हटलं? या देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. हिंदुत्वाच्या विरोधात जेव्हा आक्रमण होतं, तेव्हा तुम्ही चूप राहता.

Chandrashekhar Bawankule and Nana Patole.
Beed News : एडीट करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात बावनकुळे करणार कडक कारवाई!

तेव्हा हिंदुत्व जाते का? मुस्लीम समाजाच्या सोबत गेल्यानं हिंदुत्व जात नाही. मुस्लिम समाजाला सोबत ठेवणे यात आक्षेप नाही. त्यामुळे हिंदुत्व जात नाही, काहीही बोलायला नसल्यानं सकाळपासून भोंगा सुरू होतो. सरकारला विरोधकाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही कारण जनतेसाठी त्यांना काम करायची आहेत.

अमित शहा यांचा दौरा..

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) शिवसृष्टीच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. कुठलीही प्रचार सभा त्या ठिकाणी नाही. कार्यकर्त्यांसाठी जर नेता आला, तर त्यात बिघडते तरी काय असाही सवाल आमदार बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) उपस्थित केला. निवडणूक छोटी असो की मोठी, भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लागत असेल तर मोठ्या नेत्यांना यावच लागतं, आपल्या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांनी यावं, लहान कार्यकर्ताच संरक्षण केले पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com