Bawankule On Pawar : पवारांनी ‘त्या’ बाबी सर्वोच्च न्यायालयात का मांडल्या नाही? या स्थितीसाठी ४० वर्षांपूर्वीचे नेते जबाबदार !

Jalna Political News : सोशल इकॉनॉमिक्स सर्व्हे केला होता.
Chandrashekhar Bawankule, Sharad Pawar and Vijay Wadettiwar
Chandrashekhar Bawankule, Sharad Pawar and Vijay Wadettiwarsarkarnama

Nagpur Political News : आरक्षणाची टक्केवारी वाढवावी लागेल. यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे. फडणवीस सरकारच्या काळात जी टीम होती, त्या सर्वांनी मिळून सोशल इकॉनॉमिक्स सर्व्हे केला होता. सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडताना मराठा समाज कसा मागास आहे, हे महाविकास आघाडी सरकार आणि विजय वडेट्टीवार मांडण्यात नापास झाले होते, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. (A socio-economic survey was conducted)

आज (ता. ४) नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, शरद पवारांनी या सर्व बाबी सर्वोच्च न्यायालयात का मांडल्या नाही? आणि आता हे लोक कशासाठी तांडव करत आहेत? आज जी स्थिती झाली, त्याला ४० वर्षांपूर्वीचे नेते आणि उद्धव ठाकरे व त्यांच्या सरकारमध्ये काम करणारे नेते जबाबदार आहेत, असा घणाघाती आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करून ते ओबीसीला (OBC) देणे काही योग्य नाही. परंतु मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्याबद्दलचे जे काही नियम असतील, कायदे असतील, कायद्यानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याचा फडणवीस सरकारने जो निर्णय घेतला होता, त्यानंतर फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने आरक्षण दिले होते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण फडणवीस सरकारने केले होते, त्या सर्वेक्षणाप्रमाणे पुढे कसे जाता येईल आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, त्या पूर्ण कशा करता येतील, याचा सरकारने खुलासा केला आहे. आज बैठकही घेतली आहे. पहिल्यापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सकारात्मक आहेत.

Chandrashekhar Bawankule, Sharad Pawar and Vijay Wadettiwar
Bawankule on Sharad Pawar : बावनकुळेंना अजूनही वाटतं की, शरद पवारांचे मनपरिवर्तन होईल, कारण...

वडेट्टीवारांची भूमिका चुकीची..

ओबीसीतून आरक्षण द्या, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे, ती योग्य नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, याची टक्केवारी केली पाहिजे. त्यासाठी वेगळी टक्केवारी नियमाप्रमाणे जी काही करून घेता आली पाहिजे, ती विचारत घेतली गेली पाहिजे.

ओबीसीतून आरक्षण काढून मराठा समाजाला द्या या वडेट्टीवारांच्या भूमिकेमुळे समाजा-समाजांत वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून वडेट्टीवारांची भूमिका योग्य नाही. ते असं का बोलले मला माहीत नाही.

Chandrashekhar Bawankule, Sharad Pawar and Vijay Wadettiwar
Chandrashekar Bawankule On Reservation : या, भेटा पण राजकारण करू नका ; बावनकुळेंचा राजकीय नेत्यांना सल्ला..

राजकारणापोटी इतका खालचा स्तर गाठावा, हे योग्य नाही. ओबीसींचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला द्यावे, ही भूमिका चुकीची आहे. मराठा समाजाला आरक्षण देता येतं, वेगळे आरक्षण त्यांना देता येईल. त्यासाठी ओबीसीवर किंवा इतर समाजांवर अन्याय करण्याची गरज नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in