Bawankule : असत्य बोलून राजकारण करणारे फडणवीस नाहीत, पवारांच्या प्रतिक्रियेवर बोलले बावनकुळे !

Devendfa Fadanvis : स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. त्यावर मी बोलणं योग्य नाही.
Devendra Fadanvis, Shard Pawar and Chandrashekhar Bawankule
Devendra Fadanvis, Shard Pawar and Chandrashekhar BawankuleSarkarnama

Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar's Statement : राज्यात आजही चर्चा होत असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या त्या शपथविधीची चर्चा आजही होते आहे. शपथविधीच्या आधी आम्ही पवार साहेबांशी चर्चा केली होती, असे वक्तव्य फडणवीसांनी केले. देवेंद्र सभ्य, सुसंस्कृत नेते आहेत, असत्याचा आधार घेऊन ते राजकारण करतील, असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

याविषयी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता, या विषयी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. त्यावर मी बोलणं योग्य नाही. येवढ्या वर्षांपासून मी फडणवीस यांना ओळखतो, असत्य बोलून राजकारण करणारे ते नाहीत. वेळप्रसंगी पद सोडतील, पण खोटं बोलून ते राजकारण करणार नाहीत आणि स्वयंसेवक म्हणून ते कधीही चुकीचा मार्ग निवडणार नाही, असे परखड मत त्यांनी मांडले.

संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता, संजय राऊत यांच्यावर महाराष्ट्राने विश्वास ठेवणं बंद केलंय. जेलमध्ये गेले तेव्हापासून ते शिवराळ भाषेत बोलताहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलावं, इतकी उंची राऊत यांची नाही. षड्यंत्रात संजय राऊत असतील. कदाचित हे अनेक दिवसांचं प्लॅनिंगही असेल आणि त्या टीममध्ये संजय राऊत यांच्यासोबत उद्धव ठाकरे असतील. महाविकास आघाडी सरकार निसर्गाने पाडलंय. परमेश्वराने या प्रकरणात महाराष्ट्राच्या जनतेला न्याय दिला, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

तुम्ही जनतेच्या मतांशी खेळ मांडला म्हणून निसर्गाने बदला घेतला. अडीच वर्षांचे १८ महिने तुमचे आमदार नाराज होते. आमदारांना कुणी विचारत नव्हतं. शिवसेनेचे आमदार पाडून १०० आमदार निवडून आणायचा प्लॅन राष्ट्रवादीने केला. तेव्हा शिंदेंच्या पाठीमागे आमदार आले. शरद पवार यांची साथ मिळत नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे यांची हिंमत होऊ शकत नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

Devendra Fadanvis, Shard Pawar and Chandrashekhar Bawankule
BJP News : प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे, असं बावनकुळे का म्हणाले..

भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी माझ्यावर वारंवार दबाव होते, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्धा येथे म्हटले. याबाबत विचारले असता, अनिल देशमुख खोटं बोलताहेत. मी तोंड उघडलं तर देशमुख अडचणीत येतील. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी काय झालं, हे सांगितलं तर ते चांगलेच अडचणीत येतील. अनिल देशमुख जमानतीवर बाहेर आले आहेत. याचं भान ठेऊन त्यांनी बोललं पाहिजे. ते अद्याप निर्दोष सिद्ध झालेले नाहीत, असंही बावनकुळे म्हणाले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख (Anil Deshmukh) भाजपची तिकीट मागायला गेले होते, अशी तेव्हा जबरदस्त चर्चा होती. याबाबत आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री झाले तर आपलं धोपटी बेलणं घेऊन जावे लागेल. म्हणून त्यांनी षड्यंत्र रचलं होतं. माझ्यावर ईओडब्लूची चौकशी झाली होती, मी ओबीसी नेतृत्व नव्हतो का, असा सवाल बावनकुळेंनी केला. काल वंचितने माझी तक्रार केली आहे. मग मी आकांत तांडव करायचं काहीही कारण नाही. चौकशीला सामोरं जावं लागेल आणि मी त्यासाठी तयार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com