Bawankule : बावनकुळे विचारतात, `त्यासाठी` अजित पवार जबाबदार नाहीत का?

Gopinath Munde : गोपीनाथ मुंडे हे आमचे ऋद्धास्थान आहेत.
Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule and Ajit PawarSarkarnama

Nagpur Chandrakant Bawankule's News : गोपीनाथ मुंडे पुतळा अनावरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावले नाही, याची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. पण या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवरांना बोलावलं आहे. पुढच्या एका कार्यक्रमात मी आणि देवेंद्र फडणवीस जाणार आहोत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. (Me and Devendra Fadnavis are going)

नागपुरात आज पत्रकारांशी बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, या कार्यक्रमाचे दोन भाग आहेत. गोपीनाथ मुंडे हे आमचे ऋद्धास्थान आहेत. काही लोकांना कार्यक्रमाचे नियोजनही माहिती नाही, तरीही काहीच्या काही गोष्टी उठवल्या जात आहेत. कुणाला समितीत घेतलं कुणाला नाही घेतलं हा सरकारचा अधिकार आहे, शेवटी समितीमध्ये कुणाचं नाव द्यायचं नाही द्यायचं हा सरकारचा अधिकार आहे.

समितीमध्ये कुणाला घेतलं कुणाला नाही घेतलं, यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे, हे महत्त्वाचे आहे. कोण समितीत असेल, कोण नसेल याला अर्थ नाही. युतीमध्ये २०२४ च्या निवडणुकीत शिंदे गटाला फक्त ४८ जागा मिळतील, अशी चर्चा रंगली आहे. याबाबत विचारले असता, २८८ मतदार संघांमध्ये भाजप प्रचंड तयारी करते आहे. आम्ही जेवढी तयारी करू ती शिवसेनेच्या कामात येईल आणि शिवसेना जेवढी तयारी करेल ती भाजपच्या कामात येईल, असे ते म्हणाले.

अजित पवार यांना समजलं पाहिजे की, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. तीन प्रकरणांपैकी एक प्रकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसने दाखल केले आहे. हे प्रकरण लवकर निकाली निघत नाही, यासाठी जबाबदार अजित पवार (Ajit Pawar) नाही का, असा सवाल आमदार बावनकुळेंनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर होत नाही यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस जबाबदार असल्याचेही ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar
Bawankule : संजय राऊतांना मी एक आरसा पाठवतो, असं का म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

नाना पटोले यांनी धार्मिक बाबीवर बोलू नये..

इतर धार्मिक कार्यक्रमात जहरी टीका होते. समाजा-समाजांत तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. त्या ठिकाणी नाना (Nana Patole) का बोलत नाहीत. हिंदू विचारांवर बोलणाऱ्यांना ते विरोध का करतात? काही चुकीचं असेल तर ते सांगितलं पाहिजे, पण कुणाचा कार्यक्रम घेऊच नये, असे म्हणणे योग्य नाही. काही चुकत असेल नानांनी सांगावे, चूक दुरुस्त केली जाईल. पण कार्यक्रमच घेऊ नका असे म्हणणे महाराष्ट्रात (Maharashtra) चालणार नाही. कारण येथे मोगलाई नाही.

टिका करणाऱ्यांनी आरशात चेहरा बघावा..

शेतकऱ्यासाठी (Farmers) या सरकारने बरेच काही केलं आहे, कुठल्याही सरकारला तेवढं केलं नाही, विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही आणि आणि आरोप करायचे, मात्र त्यांनी आपला पूर्व इतिहास बघितला पाहिजे, विरोधकांनी टीका करण्यापेक्षा आपला चेहरा आरशात बघितला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी हे सरकार नक्कीच चांगली घोषणा करेल तोडगा निघेल शेतकऱ्यांना मदत मिळेल, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in