बावनकुळे म्हणाले, पावणेतीन लाख गरीबांचे धान्य मंत्र्यांनी खाल्ले...

गुंठेवारी कायद्यांतर्गत ५६ रुपये असलेले विकास शुल्क १६८ करून गोरगरिबांचे घरकुलांचे स्वप्न हिरावून घेण्याचा निर्णय या सरकारने Mahavikas Government घेतला.
बावनकुळे म्हणाले, पावणेतीन लाख गरीबांचे धान्य मंत्र्यांनी खाल्ले...
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : कोविड काळात केंद्र सरकारने १९ महिने प्रत्येक व्यक्तीला मोफत धान्याचा पुरवठा केला. असे असताना महाविकास आघाडी सरकारने सुमारे पावणेतीन लाख रेशनकार्डधारकांना धान्यापासून वंचित ठेवले. हे धान्य खुल्या बाजारात विकून मंत्र्यांनी मोठी कमाई केली. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी या गरीब लोकांचे धान्य खाल्ले, असा घणाघाती आरोप माजी ऊर्जामंत्री व भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

रेशधारकांच्या मागण्यांसाठी काल काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व बावनकुळे यांनी केले. त्यावेळी ते महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप करीत तुटून पडले. ते म्हणाले, गुंठेवारी कायद्यांतर्गत ५६ रुपये असलेले विकास शुल्क १६८ करून गोरगरिबांचे घरकुलांचे स्वप्न हिरावून घेण्याचा निर्णय या सरकारने घेतला. याचाही भाजपच्यावतीने कडाडून विरोध केला जाणार आहे. यावेळी प्रमुख्याने रेशनकार्ड मोर्चाचे संयोजक विजय आसोले, गुंठेवारी प्रमुख मुन्ना यादव, शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके, आमदार गिरीष व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, महापौर दयाशंकर तिवारी, प्रदेश उपाध्यक्ष सजंय भेंडे, माजी आमदार अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, ज्येष्ठ नगरसेवक धर्मपाल मेश्राम, अर्चना डेहनकर, अश्विनी जिचकार, अविनाश ठाकरे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षाने काल प्रचंड मोर्चा काढून जमावबंदी आदेश धुडकावला. रेशनधारकासंदर्भातील आदेश राज्य शासनाने मागे घ्यावा, या मागणीसाठी यशवंत स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर काढलेल्या मोर्चात २५ हजार नागरिक सहभागी झाले होते, असे भाजप नेत्यांनी सांगितले. मोर्चाला पोलिसांनी आकाशवाणी चौकात अडवले. येथेच भाजपने सभा घेतली.

Chandrashekhar Bawankule
बावनकुळे संतापले; म्हणाले... तर आम्ही सरकारला सोडणार नाही !

मोर्चादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार मुर्दाबाद के नारे लावले. आंदोलनात नीता ठाकरे, वीरेंद्र कुकरेजा, महामंत्री सजंय बंगाले, राम आंबुलकर, बाल्या बोरकर, सुनील मित्रा, संजय अवचट, देवेन दसतुरे, विनोद कन्हेरे, किशोर वानखेडे, किशोर पलांदुरकर, संजय चौधरी, राजेश हातीबेड, वर्षा चौधरी, सरिता माने, विशाखा जोशी, राजेंद्र सायरे, निशा भोयर, ज्योती देवघरे, रेखा निमजे, पारेन्द्र पटेल, सन्नी राऊत, अमर धर्मारे, यश सातपुते, शेखर सर्यवंशी, पंकज सोनकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in