बावनकुळे म्हणाले, महाविकासच्या काळातील प्रभाग रचना रद्द करा !

आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांना विनंती केली आहे की, चुकीच्या पद्धतीने झालेली प्रभाग रचना रद्द करावी, असे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : महानगरपालिका, (Municipal Corporation) नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि ग्रामपंचायतीच्या ज्या प्रभाग रचना झाल्या, त्यामध्ये महाविकास आघाडीत असलेल्या सर्व नेत्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव आणून निवडणुकीच्या प्रभाग रचनेमध्ये नियमांत बसत नाहीत, अशा प्रभाग रचना करवून घेतल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

हजारो हरकती घेऊन त्यावर सूचना स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रभाग रचनेवर दिल्या. प्रभाग रचना नियमांत नाहीये, चुकीची झाली आहे. राजकीय हेतू ठेवून गावे जोडली गेली आहेत, काढली गेली आहेत. महाविकास आघाडीचेच (Mahavikas Aghadi) उमेदवार निवडून येतील, अशा पद्धतीने प्रभाग रचना केली गेली. आता ही प्रभाग रचना मुख्य निवडणूक आयुक्तांनी (Election Commissioner) अंतिम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांना विनंती केली आहे की, चुकीच्या पद्धतीने झालेली प्रभाग रचना रद्द करावी, असे आमदार बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत पैनलिस्ट चंदन गोस्वामी, अनिल निधान, व्यंकटेश कारेमोरे, कैलास बरबटे होते.

या प्रभाग रचनेवर जेवढ्या हरकती व सूचना आल्या, त्या एका मिनिटांत फेटाळल्या गेल्या. त्या सूचना आता पुन्हा विचारात घेण्यात याव्या आणि निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे प्रभाग रचना पुन्हा करावी आणि त्यानंतरच निवडणुका घ्याव्या. कारण आत्ताच्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेतल्यास त्या राजकीय होतील कारण त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दबावात करण्यात आल्या आहेत. निवडणूक नियमांचा भंग होऊ नये, म्हणून आयोगाने सध्याची प्रभाग रचना रद्द करावी, अशी आमची मागणी आहे आणि आयोग ही मान्य मान्य करेल, अशी अपेक्षा असल्याचे आमदार बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
Video: NMRDA चा भ्रष्टाचार बाहेर काढणार !; चंद्रशेखर बावनकुळे

शेख हुसेनवर कारवाई का नाही ?

कॉंग्रेसच्या एका मोर्चामध्ये त्यांचे नेते शेख हुसेन यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अतिशय नीच भाषेत वक्तव्य करून त्यांचा अवमान केला. त्यावर तेथे उपस्थित कॉंग्रेस नेत्यांनी टाळ्याही वाजवल्या. त्यानंतर कायदेशीर मार्गदर्शन घेऊन, कोणत्या कलमांनुसार गुन्हे दाखल केले पाहिजे, याची सर्व माहिती घेऊन पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. पण अजूनही पोलिसांनी हुसेन यांच्यावर कायदेशीर कलमा लावल्या नाहीत. त्यामुळे आज पुन्हा नागपूर पोलिस आयुक्तांना भेटून मागणी करणार आहे, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

आम्ही सांगितलेल्या कलमा पोलिसांना शेख हुसेन यांच्यावर लावाव्या लागतील. कारण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्याला जेलमध्ये जावे लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीलासुद्धा जेलमध्ये टाकण्यात आले. त्या कारवाईचे आम्ही समर्थनच करतो. कुणाही अशा अपमानजनक पोस्ट सोशल मिडियावर करू नये, ही आमची भूमिका आहे. पण त्या कारवाईप्रमाणे जो कायदा वापरला गेला, तोच कायदा शेख हुसेन यांच्या बाबतीतही वापरायला हवा, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे आज पोलिस आयुक्तांना भेटून विनंती करणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in