गडकरी, फडणवीसांच्या उपस्थितीत भरला बावनकुळेंनी अर्ज…
Chandrashekhar Bawankule and Nitin Gadkari at Collector OfficeSarkarnama

गडकरी, फडणवीसांच्या उपस्थितीत भरला बावनकुळेंनी अर्ज…

या निवडणुकीत विजय भारतीय जनता पक्षाचाच होईल, असे चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी नामांकन अर्ज सादर केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

नागपूर : राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि प्रदेश सरटिचणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संस्थापक सुलेखाताई कुंभारे यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करून विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

आज सकाळी १०.३० वाजता आकाशवाणी चौकातून रॅली निघून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. तेथे ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बावनकुळेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निवडणूक प्रमुख, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, सह निवडणूक प्रमुख डॉ राजीव पोतदार, खासदार डॉ. विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, हिंगण्याचे आमदार समीर मेघे, आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, ना.गो गाणार, महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, माजी आमदार सुधाकर देशमुख, अनिल सोले, सुधाकर कोहळे, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, चरणसिंह ठाकूर भाजप पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हापरिषद,नगरपालिका आणि पंचायत समिती सदस्य हजर होते.

आज सकाळी १०.३० वाजता शहर व जिल्ह्यातील सर्व भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आकाशवाणी चौकात एकत्र आले. त्यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद घेतला. गडकरी यांच्या निवासस्थानी कांचनताई गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना औक्षण करून शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्योतीताई बावनकुळे, संकेत बावनकुळे, पायल आष्टनकर व लोकेश आष्टनकर उपस्थित होते. सकाळी १०.३० वाजताच आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरील दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक थांबविण्यात आली होती. सकाळपासूनच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली. रस्त्यावर भाजपचे झेंडे असलेली वाहने फिरत होती. सकाळपासून हा परिसर भाजप कार्यकर्तेमय झाला होता.

Chandrashekhar Bawankule and Nitin Gadkari at Collector Office
बावनकुळे म्हणाले, पावणेतीन लाख गरीबांचे धान्य मंत्र्यांनी खाल्ले...

पक्षाने दिलेल्या आदेशानुसार आज विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे मतदार सर्वाधिक आहेत आणि महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्व सदस्य सोबत आहेत. त्यामुळे ही निवडणूक तशी सोपी आहे. तरीही पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता विजयश्री मिळविण्यासाठी कंबर कसून आणि उत्सुक आहे. या निवडणुकीत विजय भारतीय जनता पक्षाचाच होईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नामांकन अर्ज सादर केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

Related Stories

No stories found.