Barshitakali News : नऊ नगरसेवकांचा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट !

Shivaji Maharaj : नगरसेवकांच्या या भुमिकेने शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajSarkarnama

Akola District Barshitakali Panchayat Samiti News : जिल्ह्यातील एकमेव नगरपंचायत असलेल्या बार्शीटाकळी येथील नगरपंचायतच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आणि अपक्ष सदस्यांनी बार्शीटाकळी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची परवानगी देण्यास नकार दिला आहे. (Permission to erect a statue of Shivaji Maharaj has been refused)

सदस्यांच्या या भुमिकेने शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. भाजपचे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी याचा निषेध केला आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या बार्शीटाकळी नगरपंचायतची ३ एप्रिल २०२३ रोजी तहकुब झालेली सर्वसाधारण काल (ता. २६) रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेतील सर्व विषयांना मंजुरी दिल्याचे पत्र नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी दिले.

या सभेतील विषय सुचीवर चौथ्या क्रमांकाचा विषय पंचायत समिती बार्शीटाकळी कार्यालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास परवानगी देण्याचा होता. हा विषय नामंजूर करीत असल्याचे काल २६ एप्रिल रोजी नगरसेवकांच्या स्वाक्षरीने मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. नऊ सदस्यांच्या त्यावर स्वाक्षऱ्या आहेत. नगरसेवकांनी दिलेल्या या पत्राबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनीही नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची परवानगी नाकारल्याबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून राजकारण करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या काही नगरसेवकांनी ठरावाला विरोध केला. देशातच नव्हे तर जगात आज ज्यांच्यामुळे मानसन्मान आहे, महाराष्ट्राची ओळख आहे, अशा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला, त्याचा मी जाहीर निषेध करीत असल्याचे आमदार पिंपळे म्हणाले.

Chhatrapati Shivaji Maharaj
Akola Lok Sabha : अकोल्यासाठी ठाकरे-आंबेडकरांनी जुळवलेले गणित; पवारांच्या गुगलीमुळे फिस्कटले?

अठरापगड जातीला सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी संदर्भात बार्शिटाकळी नगर पंचायतच्या सर्वसाधारण सभेत पाच विरूध्द नऊ मतांनी पुतळ्यास परवानगी नाकारण्यात आल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

बार्शिटाकळी पंचायत समिती सभापती यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ, मंगरुळपीर रस्ता तसेच शहरात जाणाऱ्या रस्त्यापासून सुमारे १५ फुट आत असलेल्या पंचायत समितीच्या आवारात, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याकरीता, पंचायत समितीचे २२ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये ७ डिसेंबर १९९४ रोजी पारित झालेल्या ठरावावर कार्यवाही करण्याबाबत ठराव मंजूर झाला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
APMC Akola Election : अकोल्यात ठरलं; शिवसेना पाळणार महाविकास आघाडीचा धर्म !

सदर पुतळा हा पंचायत समिती परीसरात उभारण्यात येणार असून अकोला ते मंगरूळपीरकडे जाणारा तसेच बार्शिटाकळी शहराकडे जाणाऱ्या या दोन्ही रस्त्यांचे नियमाप्रमाणे रूंदीकरण झाल्यास कोणतीही अडचण व समस्या निर्माण होणार नाही, ही दखल घेवून पुतळा, जागा निश्चित करण्यात आली आहे.

नगर पंचायतच्या सर्व साधारणसभेत महाराष्ट्राचे (Maharashtra) आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा उभारण्याच्या विषयावर मुद्दा क्रमांक चार नुसार विचारविनिमय होवू नये, या समर्थनार्थ, (Congress) कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह वंचित (Vanchit Bahujan Aghadi) आणि अपक्ष अशा नऊ नगरसेवक, नगरसेविकांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या विरोधात भाजप आंदोलन करणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com