कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर म्हणाले, अखेर हुकूमशहा झुकले...

आज कायदे मागे घेतले गेल्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा देशातील शेतकऱ्यांचा विजय आहे. शेतकरी बांधवांच्या एकजुटीचा विजय असल्याचे त्यांनी MP Balu Dhanorkar सांगितले.
कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर म्हणाले, अखेर हुकूमशहा झुकले...
MP Balu Dhanorkar and MLA Pratibha Dhanorkar Sarkarnama

नागपूर : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणलेले कृषी कायदे, हे तीन काळे कृषी कायदे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीसह राजकीय पक्ष आणि शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी या कायद्यांचा विरोध केला होता. पण मग्रूर भाजप सरकार काही केल्या ऐकायला तयार नव्हते. जगाच्या पोशिंद्यासमोर अखेर मोदी सरकारला झुकावे लागले, असे कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर म्हणाले.

आज मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. खासदार धानोरकर म्हणाले, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या भवितव्यावर गदा आणणारे तीन काळे कायदे अखेर रद्द झाले. शेतकऱ्यांच्या अखंड एकजुटीच दर्शन घडविणाऱ्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलन राजधानीच्या सीमेवर गेले अनेक महिने सुरू आहे. त्या आंदोलनात कित्येक निरपराध शेतकरी बांधवांना आपला जीव गमवावा लागला.

काहींना तर गाडीखाली चिरडण्याचं निष्कृत्य या सरकारने केलं. परंतु, हा अत्याचार सहन करून देखील आपले शेतकरी बांधव खचले नाहीत. ते अडून राहिले, अढळ राहिले, संघर्ष सुरू ठेवला आणि आज त्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं आहे. आज कायदे मागे घेतले गेल्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा देशातील शेतकऱ्यांचा विजय आहे. शेतकरी बांधवांच्या एकजुटीचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले.

MP Balu Dhanorkar and MLA Pratibha Dhanorkar
आता आणखी काय-काय विकणार आहात : आमदार प्रतिभा धानोरकर

...तर हजारो शेतकऱ्यांचा जीव वाचला असता : आमदार प्रतिभा धानोरकर

कृषी क्षेत्र या देशाचा आत्मा आहे. अन्नधान्य ही भुकेची समस्या सोडविण्याचा मार्ग आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पुढे अखेर सरकारला झुकावं लागलं आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. अन्नदात्यांचा सत्याग्रहासमोर हे अहंकारी सरकार झुकले आहे. अशी टीका आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.

देशात विविध ठिकाणी पोट निवडणुकीत भाजपला आलेलं अपयश आणि उत्तर प्रदेशसह आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णय घेतला, पण कुठलाही निर्णय घेताना राज्यकर्त्यांनी एवढा उशीर करू नये. निर्णय लवकर घेतला असता तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते. त्यामुळे निर्णय घेणे लवकर घेणे अपेक्षित होते. अशी प्रतिक्रिया आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.