Balu Dhanorkar News : हिंमत असेल तर लोकसभा लढवून दाखवा; नाही तर मी ब्रम्हपुरीतून लढतो, बाळू धानोरकर भडकले...

Chandrapur : बाजार समितीच्या निकालावरून विनाकारण चिखलफेक करण्याचे काम करीत आहेत.
Balu Dhanorkar
Balu DhanorkarSarkarnama

MP Balu Dhanorkar on MLA Vijay Wadettiwar : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चंद्रपूरमध्ये कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. कॉंग्रेस नेते आणि चंद्रपूरचे खासदार म्हणून बाळू धानोरकर यांनी पराभवाची जबाबदारी घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया काल (ता. २९) माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी निकालानंतर दिली होती. त्यावरून कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर जाम भडकले आहेत. (I am capable of contesting any election)

स्वतःचे गाव असलेल्या चंद्रपूर बाजार समितीवर खासदार बाळू धानोरकर यांची एकहाती सत्ता यायला हवी होती, पण तसे झाले नाही. त्यामुळे या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आली आहे, असेही वडेट्टीवार समर्थक म्हणाल होते. यासंदर्भात ‘सरकारनामा’शी बोलताना खासदार धानोरकर म्हणाले की, बाजार समितीची निवडणूक स्थानिक समीकरणांवर होते. येथे राजकीय पक्षांचा तसा काही संबंध नसतो. तरीही माजी मंत्री आणि आमदार विजय वडेट्टीवार यांचे समर्थक बाजार समितीच्या निकालावरून विनाकारण माझ्यावर चिखलफेक करण्याचे काम करीत आहेत. त्यांची ही कृती कदापि योग्य नाही.

आमदार विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी केलेल्या टीकेनंतर खासदार धानोरकर जाम भडकले आहेत. कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी मी सक्षम आहे. केवळ बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालावरून जर असले प्रकार केले जात असतील तर मी त्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी मला आरसा दाखवू नये.

बाळू धानोरकर निवडणूक लढवण्यासाठी स्वतः सक्षम आहे. इच्छा असेल तर त्यांनी येथे येऊन लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी. अन्यथा मी त्यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला तयार आहे आणि ती निवडणूक मी जिंकूनही दाखवतो, असे आव्हान खासदार बाळू धानोरकर यांनी दिले आहे.

Balu Dhanorkar
Balu Dhanorkar News : तेव्हा बाबासाहेबांनी जातिवादाला जोरदार टक्कर दिली होती, आणि आज...

बाजार समितीच्या निवडणुका म्हणजे विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका नाहीत, हे ज्येष्ठ नेत्यांना तरी कळायला हवे. स्थानिक राजकारण (Politics) आणि समीकरणे माहिती असताना अशा टिका करणे योग्य नाही. तरीही त्यांनी म्हणा किंवा त्यांच्या समर्थकांनी जी टिका काल (ता. २९) केली, ते आव्हान स्वीकारायला मी तयार आहे.

आता त्यांनी माझे आव्हान स्वीकारावे आणि चंद्रपूर (Chandrapur) लोकसभेची निवडणूक (Election) लढवून दाखवावी. नाहीतर मी त्यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतो आणि जिंकूनही दाखवतो, असे थेट आव्हान बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी दिले आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com