Leaders On Balu Dhanorkar: धानोरकरांच्या जाण्याने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी; सर्वपक्षीय नेत्यांची प्रतिक्रिया !

Chandrapur : २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली.
Balu Dhanorkar
Balu DhanorkarSarkarnama

The News of Balu Dhanorkar's death is sad and shocking : बाळू धानोरकर यांचं निधन झाल्याचं कळलं, अत्यंत दुःखद घटना आहे. धानोरकर यांनी सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम केले. बहुजन समाजाला घेऊन चालणारे व्यक्तिमत्त्व होते. काँग्रेसमधील उमदे व्यक्तिमत्त्व आमच्यातून निघून गेले आहे. त्यांच्या जाण्याने बहुजन समाजाची मोठी हानी झाली आहे. (A great personality in Congress has passed away from us)

धानोरकर यांच्या निधनाने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी कमी वयात मोठी लोकप्रियता मिळविली होती. १५ दिवसांपूर्वी त्यांच्याशी भेट झाली, त्यावेळी त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र ते गेल्याचे कळल्यावर धक्का बसला, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, या शब्दांत माजी मंत्री आमदार सुनील यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

सदोदित दिसणारे हास्य स्मरणात राहील : अशोक चव्हाण

खासदार बाळू धानोरकर यांचं अचानक आजारी पडणं. अत्यवस्थ होणं आणि दोन दिवसांत त्यांच्या निधनाचे वृत्त येणं, हे सारं अकल्पनीय, अविश्वसनीय व धक्कादायक आहे. राजकीय कारकीर्द बहरास येत असताना ऐन उमेदीच्या काळात त्यांचं अकाली निधन प्रत्येकाला अस्वस्थ करणारं आहे. बाळू धानोरकर आमचे एक सक्षम, उर्जावान सहकारी होते. संवेदनशील, कर्तव्यदक्ष व सतत कार्यमग्न असे लोकप्रतिनिधी होते. जमिनीशी नाळ जुळलेले, दांडगा जनसंपर्क आणि सार्वजनिक प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या चेहऱ्यावर सदोदित दिसणारे हास्य, आपुलकीने बोलणं नेहमी स्मरणात राहील. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. या दुःखद क्षणी आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली.

Balu Dhanorkar
Balu Dhanorkar Death News : मोदी लाटेतही भाजपच्या दिग्गज नेत्याचा पराभव करत धानोरकर ठरले होते 'जायंट किलर'...

शब्द अपुरे पडत आहेत : नाना पटोले

युवा नेते, लोकनेते आणि बहुजनांचे नेते अशी ख्याती असलेला मित्र हरपला. अतिशय दुःखद घटना आहे. समाजाचा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतलेला नेता हरपला. लोकनेते असल्याने प्रचंड लाटेतदेखील ते निवडून आले. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचं वलय वाढण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या चार दिवसांपूर्वी त्यांच्याशी बोलणं झाल होतं. कधी वाटलं नव्हतं, की ते एवढ्या लवकर सोडून जातील. बाळू धानोरकरांना श्रद्धांजली देण्यासाठी आज शब्द अपुरे पडत आहेत, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं तरुण नेतृत्व हरवलं : अजित पवार

चंद्रपूर (Chandrapur) लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. चंद्रपूरच्या जनतेशी एकरूप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं तरुण नेतृत्व आपण गमावले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची, महाविकास आघाडीची मोठी हानी झाली आहे. दिवंगत बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या कुटुंबीयांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com