Amrvati : निवडणूक रिंगणातून बच्चू कडूंची माघार, आता मुकाबला मविआ व भाजपमध्ये..

MVA : मविआ व भाजपसह वंचित बहुजन आघाडी व बहुजन भारत पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

Amravati Graduate Constituency Election : प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी मेस्टा संघटनेसोबत शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील पाचही जागा लढणार असल्याचे जाहीर करून या निवडणुकीत रंगत भरली होती. पण आज अमरावतीमधील त्यांच्या उमेदवाराने माघार घेतली आहे.

प्रहार-मेस्टा व जुनी पेन्शन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, अशा दोन उमेदवारांसह दहा जणांनी माघार घेतली. यामुळे अमरावतीच्या (Amravati) रिंगणात आता २३ उमेदवार राहिले आहेत. निवडणुकीचे रिंगण स्पष्ट झाले असून यामध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व भाजपसह (BJP) वंचित बहुजन आघाडी व बहुजन भारत पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे. असे असले तरी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, अशी लढत होईल, असे सध्यातरी दिसत आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दहा उमेदवारांनी माघार घेत असल्याचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले.

एकूण ३४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. एका उमेदवाराचे वय कमी पडल्याने त्याचा अर्ज छाननीतच बाद झाला होता. आता रिंगणात २३ उमेदवार शिल्लक आहेत. महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे व भाजपचे डॉ. रणजीत पाटील यांच्यात एकास एक लढतीचे चित्र असून वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलकार, भाजपचे बंडखोर शरद झामरे, काँग्रेसचे बंडखोर श्याम प्रजापती यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. अमरावतीमध्ये प्रहारच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. पण इतर चार जागांबाबत काय, हे प्रहार आणि मेस्टाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने निवडणुकीचे रिंगण स्पष्ट झाले असले तरी खऱ्या अर्थाने बेरीज वजाबाकीच्या राजकारणास सुरुवात होणार आहे. रिंगणातील काही उमेदवार पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नांनाही गती येणार आहे. येत्या ३० जानेवारीस अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील २६२ मतदानकेंद्रांत मतदान होणार आहे. मतमोजणी दोन फेब्रुवारीस बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडावून येथे करण्यात येणार आहे.

Bacchu Kadu
Bacchu Kadu warned the Insurance Companies : बच्चू कडू सरकारवर नाराज?, दिला थेट इशारा

गोपाल वानखडे, मधुकर काठोळे, डॉ. प्रफुल्ल राऊत, राजेश दांदडे, अ‍ॅड. सिद्धार्थ गायकवाड, राजेश गावंडे, किरण चौधरी (प्रहार-मेस्टा), पांडुरंग ठाकरे, नामदेव मेटांगे व मीनल ठाकरे यांनी आज माघार घेतली आहे. मतदार नोंदणीच्या अखेरच्या मुदतीनंतर अमरावती विभागात २ लाख ६ हजार १७२ मतदारांची नोंद झाली आहे. यापूर्वी ५ जानेवारीपर्यंत १ लाख ८५ हजार ९२५ मतदार होते. अंतिम नोंदणीनंतर त्यामध्ये १९,२४७ मतदारांची वाढ झाली आहे. यामध्ये अमरावती ६४,३४४, अकोला ५०६०६, बुलढाणा ३७,८९४, वाशीम १८०५० व यवतमाळ येथे ३५,२७८ मतदार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in