Cabinet expansion : बच्चू कडूंचा धीर आता सुटत चालला; मंत्रिमंडळ विस्ताराचं काय ते एकदाच सांगा...

Bachchu Kadu : 'मंत्रिमंडळ विस्तार होत असेल तर लगेच करून घ्या. जे काही असेल ते एक घाव, दोन तुकडे करायला हवे'
 Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama

Cabinet expansion : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, असा प्रश्न विचारला जात असतानाच आज सकाळी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट याबाबत भाष्य केलं होतं. तर आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडू यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे.

''जर मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसेल तर स्पष्ट सांगणे गरजेचे आहे '', असं ते म्हणाले. त्यामुळे बच्चू कडू यांचा धीर आता सुटत चालला तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यांनी आज एका वृत्तावाहीनीशी बोलताना विस्ताराबाबत भाष्य केलं.

''मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. त्या १५ तारखेपर्यंत दूर होतील. त्यानंतर २१ ते २२ तारखेपर्यंत मंत्रीमंडळाचा विस्तार होईल. तर सगळ्याच आमदारांना मंत्रीपदाची अपेक्षा आहे'', असं आमदार संजय शिरसाट म्हणाले होते. यावरही बच्चू कडू यांनी भाष्य करत सरकारला घरचा आहेर दिला.

कडू म्हणाले, ''संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी कुठून बातमी आणली हे मला माहिती नाही. मात्र आता आम्हाला असं वाटतं की एक तर तुम्ही विस्तार करूच नका. थेट सांगा की विस्तार होणार नाही. असं सांगितलं तर सगळे शांततेने सरकारसोबत राहतील. पण एक फूल काढायचं, ते खिशात ठेवायचं, पुन्हा काढायचं असं करू नका. काय त्या अडचणी असतील त्या सांगून टाकायला पाहिजे'', असं ते म्हणाले.

 Bachchu Kadu
Cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्ताराचा संजय शिरसाटांनी सांगितला मुहूर्त

''या तांत्रिक अडचणींमुळे विस्तार होऊ शकत नाही. ते तरी सगळे ५०- ६० आमदार कुणीही याबाबत काही बोलणार नाही. सध्या बऱ्याच आमदारांची कुजबूज सुरू आहे. असं असताना तर मंत्रिमंडळ विस्तार होत असेल तर तो लगेच करून घ्यावा. जे काही असेल ते एक घाव, दोन तुकडे करायला हवे. असं सर्वांच मत आहे.''

''देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणत होते अधिवेशनाआधी मंत्रीमंडळाचा विस्तार करू. मात्र अधिवेशनही झालं. तांत्रिक अडचणी असू शकतात. आम्हाला त्याबाबत काही म्हणायच नाही. मात्र जे काही आहे ते स्पष्टपणे सांगून टाकायला हवं'', असं मत त्यांनी मांडलं.

 Bachchu Kadu
Cabinet expansion : शिरसाटांच्या मंत्रीपदाला मुहूर्त लागणार का ?

दरम्यान, शिंदे - फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूरमध्ये झालेल्या अधिवेशनाच्या आधी होणार होता असं सांगितलं जात होतं. मात्र त्यावेळी विस्तार झाला नाही. त्यानंतर १५ जानेवारीपर्यंत विस्तार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र, अद्यापही अशा कुठल्याही हालचाली दिसून येत नाहीत. यातच आता बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांचा आता धीर सुटत चालला की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in