Bachchu Kadu Latest News in Marathi
Bachchu Kadu Latest News in Marathisarkarnama

बच्चू कडू गुन्हा; तपास अधिकाऱ्याला न्यायालयाने बोलवून घेतले

एक कोटी 95 लाख रुपयांच्या रस्त्याच्या अपहाराचा आरोप बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर करण्यात आला आहे.

अकोला : अकोल्याचे (Akola) पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर दाखल झालेल्या अपहार प्रकरणाच्या गुन्ह्यातील जामिनावरील सुनावणी आज जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. आता या प्रकरणात न्यायालयाने (Court) बुधवारी (ता. 11) दुपारी 1 वाजता पुढील सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीदरम्यान, तपास अधिकारी यांनाही हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तोपर्यंत न्यायालयाने बच्चू कडू यांच्या अटकपूर्व जामिनाच्या मर्यादेत वाढ केली आहे. (Bachchu Kadu Latest News)

Bachchu Kadu Latest News in Marathi
‘त्यांच्या’ निर्णयाची पावती आमच्या नावावर फाडू नका; असं का म्हणाले अजितदादा !

वंचित बहुजन आघाडीचे (vanchit bahujan aghadi) प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन फुंडकर यांनी बच्चू कडू यांच्यावर रस्त्याच्या बांधकामांमध्ये अपहार केल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात त्यांनी पोलिसात तक्रारही केली होती. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल न केल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात अपहारासह विविध कलमान्वये बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास एक कोटी 95 लाख रुपयांच्या रस्त्याच्या अपहाराचा आरोप कडू यांच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

Bachchu Kadu Latest News in Marathi
भाजप नेत्याची बंडखोरी! नाना पटोलेंसोबत जाऊन पक्षालाच गाठणार खिंडीत

न्यायालयाने त्यांच्या अर्जावर सुनावणी करीत त्यांना नऊ मे पर्यंत अटकपूर्व जामीन दिला होता. नियमित जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी तपास अधिकारी यांना पुढील सुनावणीमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी 11 मे रोजी दुपारी एक वाजता होणार आहे. तोपर्यंत न्यायालयाने बच्चू कडू यांच्या अटकपूर्व जामीनामध्ये वाढ केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com