Bachchu Kadu : 'फुसका फटका' की बॅाम्ब ? ; ट्रेलर 1 तारखेला, 15 दिवस पिक्चर बघा !

Bachchu Kadu : बॉम्ब केव्हा, कुठे लावायचा हे बच्चू कडूला चांगले माहित आहे.
Bacchu Kadu, Ravi Rana.
Bacchu Kadu, Ravi Rana.Sarkarnama

Bachchu Kadu : आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दीक युद्ध सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींवर फैरी झडत आहेत. शिंदे गट-भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटणार का, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. आज नागपुरातून ते मुंबईला रवाना झाले. त्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.यावेळी कडू यांनी पुन्हा राणांना इशारा दिला.

रवी राणा यांनी बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप केला आहे. त्याशिवाय हा 'तोडपाणी' करणारा आमदार आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यानंतर बच्चू कडू संतापले. ते म्हणाले, 'एका बापाचा असन, त त्येनं पुरावे द्यावे. आरोप सिद्ध झाला त त्येच्या घरी भांडे घासाले जाईन,' असे आव्हान कडूंनी दिले. यासाठी त्यांनी 1 नोव्हेंबरचा अल्टिमेटमही राणांना दिला. तसेच खुलासा केला नाही तर आम्ही धमाका करु,' असाही इशारा बच्चू कडू यांनी दिला.

"दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला 'हा' एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला 'हा' फुसका फटाका आहे," असे टि्वट रवी राणा यांनी केले आहे. त्याला बच्चू कडू यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. "एक तारखेला ट्रेलर दिसेल. आणि पंधरा दिवस पिक्चर चालेल," असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

Bacchu Kadu, Ravi Rana.
Amit Shah : भर कार्यक्रमात अमित शहांनी हरियाणाच्या मंत्र्याला फटकारलं ; व्हिडिओ व्हायरल

बच्चू कडू म्हणाले, "माझा इशारा हा फुसका बार आहे की, बॅाम्ब आहे, हे 1 तारखेला दाखवू. हा बॉम्ब केव्हा, कुठे लावायचा हे बच्चू कडूला चांगले माहित आहे. बॉम्ब कसा आहे हे 1 तारखेला कळेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलायला हवे, नाही तर आम्ही आमचं काम करू,"

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घातल्या आहेत. त्यानंतरही राणांचे आरोप सुरूच होते. त्यांना सांगूनही ते ऐकत नव्हते. म्हणून मी पत्रकार परिषद घेऊन त्यांना इशारा दिला. माझ्याकडे पर्याय नव्हता," असे ते म्हणाले.

"गुवाहाटीला जाऊन आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. पैसे दिले असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे सांगावे किंवा मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी तरी तसा खुलासा करावा," असे कडू यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com