बच्चू कडू म्हणाले, माध्यमांनी आता ‘या’साठी संशोधन करायला पाहिजे !

महाविकास आघाडीचे बहुमत आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल आघाडीच्याच बाजूने लागेल, असा विश्‍वास बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी व्यक्त केला.
बच्चू कडू म्हणाले, माध्यमांनी आता ‘या’साठी संशोधन करायला पाहिजे !
Bacchu KaduSarkarnama

नागपूर : आपल्याच सरकारवर काहीसे नाराज असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अखेर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान केले. माझी नाराजी व्यक्तिगत नव्हती, तर शेतकऱ्यांच्या विषयासाठी मी ती भूमिका घेतली होती, असे बच्चू कडू यांनी आज मतदान केल्यानंतर सांगितले.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) बहुमत आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल आघाडीच्याच बाजूने लागेल, असा विश्‍वासही कडू (Bacchu Kadu) यांनी व्यक्त केला. सरकारवरील नाराजीबाबत बोलताना ते म्हणाले, नाराजी व्यक्तिगत नव्हती, तर शेतकऱ्यांसाठीचा (Farmers) विषय होता. पण आता तो विषय बऱ्यापैकी निकाली निघाला आहे. चणा खरेदी करणे सुरू झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. माझ्या त्या प्रयत्नांना यश आले, याचा आनंद आहे. शेवटी काय, आपण लोकांसाठी काम करतो, त्यांची कामे झाली नाही, तर अशी भूमिका घ्यावी लागते, असेही ते म्हणाले.

आघाडीत बिघाडी हा विषय नेहमी चर्चिला जातो. विरोधकांकडून ठरावीक कालावधीनंतर हा विषय छेडला जातो. महाविकासचे नेतेही अधूनमधून एकमेकांविरोधात बोलत असतात. याबाबत विचारले असता, बच्चू कडू म्हणाले, आघाडीत बिघाडी हे विषय विरोधकांसाठी आणि काही नेत्यांपुरताच मर्यादित आहे. महत्वाचे म्हणजे हे विषय बाहेरच असतात. पण बैठकीतील नेत्यांचे बोलणे काही वेगळेच असते. नेत्यांनी बाहेर केलेली वक्तव्ये आणि बैठकीतली भूमिका, यात जमीन आसमानचं अंतर असतं. हे शोधून काढलं पाहिजे. माध्यमांनी या विषयात संशोधन केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Bacchu Kadu
बच्चू कडू म्हणाले, रवी राणा आमच्या गिनतीतही नाही...

या सरकारवर किंवा कुणावरही माझी व्यक्तिगत नाराजी कधीच राहणार नाही. यावेळी माझ्या नाराजीचा जो विषय करण्यात आला, तो शेतकऱ्यांचा विषय होता. त्यांच्या मालाची खरेदी रखडली होती. तो विषय पुढे आणण्यासाठी म्हणून मी नाराजी व्यक्त केली होती. निवडणुकीवर बहिष्कार, असे काहीच मी बोललेलो नव्हतो. त्यामुळे हा विषय आता संपलेला आहे, पुढे वाढवण्यात काहीही अर्थ नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in