बच्चू कडू म्हणाले, रवी राणा आमच्या गिनतीतही नाही...

बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी ते आमच्या गिनतीतही नाही, असे म्हणत त्यांच्या वक्तव्याचा आज चांगलाच समाचार घेतला.
बच्चू कडू म्हणाले, रवी राणा आमच्या गिनतीतही नाही...
Bacchu Kadu and Ravi Rana.Sarkarnama

भंडारा : राज्यसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांचा फोकस अपक्षांवर आहे. राज्यमंत्री बच्चू कडू आज येथे आले असताना राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात विचारले असता, रवी राणा आमच्या गिनतीतही नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

आम्ही अपक्षांनी पत्ते पिसून ठेवले आहेत. ते टाकायचे काम आता फक्त बाकी आहे. माझ्या संपर्कात अनेक अपक्ष आमदार असून राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचेच (BJP) उमेदवार निवडून येतील, असे वक्तव्य अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केले होते. बच्चू कडू (Minister of State Bacchu Kadu) यांनी ते आमच्या गिनतीतही नाही, असे म्हणत त्यांच्या वक्तव्याचा आज चांगलाच समाचार घेतला. प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्ता बैठकीसाठी बच्चू कडू आज भंडाऱ्यात आले होते.

राज्यसभा निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हापासून अपक्ष आमदार आघाडीच्या सोबत आहेत आणि ते आजतागायत आहेत. महाविकास आघाडीनेही या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आघाडीतील सर्व अपक्ष आमदार आमच्या संपर्कात आहेत. कुणी काहीही, कसेही दावे केले तरी आमचे सदस्य कुठेही भटकणार नाहीत. त्यामुळे कुणाच्या बरळण्याकडे लक्ष देण्याची आम्हाला गरज नाही. महाविकास आघाडी या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवेल, यात तिळमात्र शंका नाही.

Bacchu Kadu and Ravi Rana.
बच्चू कडू म्हणाले, केंद्राच्या आयात निर्यात धोरणांमुळे शेतकरी उदध्वस्त

सर्व राजकीय पक्ष आणि नेते अपक्षांना टारगेट करीत आहेत. आमदार रवी राणा यांनीही अपक्ष आमदारांवरच जोर दिला. घोडेबाजार या शब्दाच्या वापरावरून अपक्ष आमदार आधीच चिडलेले आहेत. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आपला संताप आज व्यक्तही करून दाखविला. त्यामुळे आता तरी अपक्ष आमदारांचा घोडेबाजार असे कुणी संबोधू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यातही आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू चिडलेले दिसले. त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता, ‘ते आमच्या गिनतीतही नाही’, असे एका वाक्यात उत्तर देत त्यांनी हा विषय संपविला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in