बच्चू कडू यांना मोठा दिलासा; 9 मे पर्यंत अटक टळली

या प्रकरणी 9 मे ला अंतिम सुनावणी होणार आहे. तोपर्यंत बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला.
Bachchu Kadu
Bachchu Kadusarkarnama

अकोला : अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी रस्त्यांच्या कामांमध्ये अपहार केल्याच्या तक्रारीवरून न्यायालयाने (Court) त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना (Police) दिले होते. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला होता.

Bachchu Kadu
नवनीत राणांना व्हायचंय केंद्रात मंत्री! खासदार तुमानेंचा गौप्यस्फोट

दरम्यान, आज बच्चू कडू यांच्या कडून अकोल्यात जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना नऊ मे पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणी 9 मे ला अंतिम सुनावणी होणार आहे. तोपर्यंत बच्चू कडू यांना न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला.

Bachchu Kadu
कृष्णप्रकाश हे बदलीवर अद्यापही नाराज, पवारानंतर आता ठाकरेंना भेटणार

बच्चू कडू यांच्या अटकपूर्व जामिनावर दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला. मात्र, सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांच्या वकिलांची बाजू मान्य करीत त्यांना दिलासा दिला. अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून बच्चू कडू यांनी 1 कोटी 95 लाखांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप, वंचित बहुजन आघाडीचे धैर्यवर्धन पुंडकर यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com