बच्चू कडू यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी

एक कोटी 95 लाख रुपयांच्या रस्त्याच्या अपहाराचा आरोप बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यावर करण्यात आला आहे.
बच्चू कडू यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज 
पुन्हा सुनावणी
बच्चू कडू

bacchu kadu Court Hearing

अकोला: अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज अकोल्यातील सत्र न्यायालयात (Court) सुनावणी होणार आहे. रस्ते निधी अपहार प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून बच्चू कडू यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे (vanchit bahujan aghadi) प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन फुंडकर यांनी बच्चू कडू यांच्यावर रस्त्याच्या बांधकामांमध्ये अपहार केल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात त्यांनी पोलिसात तक्रारही केली होती. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल न केल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात अपहारासह विविध कलमान्वये बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास एक कोटी 95 लाख रुपयांच्या रस्त्याच्या अपहाराचा आरोप कडू यांच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

बच्चू कडू
नाना पटोले हेच खरे गुन्हेगार; राष्ट्रवादीचा पलटवार

न्यायालयाने त्यांच्या अर्जावर सुनावणी करीत त्यांना नऊ मे पर्यंत अटकपूर्व जामीन दिला होता. नियमित जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी तपास अधिकारी यांना पुढील सुनावणीमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. पुढील सुनावणी आज दुपारी एक वाजता होणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.