'लाज वाटत नाही का तुम्हाला?'; बच्चू कडूंनी राणा दांपत्याची लाज काढली....

Bacchu Kadu| Shivsena| तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्याने सरकारचे आभार मानावे,
'लाज वाटत नाही का तुम्हाला?'; बच्चू कडूंनी राणा दांपत्याची लाज काढली....
Bacchu Kadun on Navneet Rana and ravi rana, Bacchu Kadun Latest News in Marathi, Navneet Rana Latest News

Bacchu Kadu On Navneet Rana and Ravi Rana

अकोला : तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्याने सरकारचे आभार मानावे, सुदैव आहे तुमचं की तुम्हाला दणके बसले नाहीत, तुम्ही त्यातच खुशी माना, असा सणसणीत टोला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राणा दांपत्याला लगावला आहे. मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाच्या हट्टामुळे राणा दांपत्याला तुरुंगाची वारी करावी लागली. इतकं होऊनही अजूनही राजकारण शांत झालं नाही. आता हे प्रकरण आता थेट दिल्लीपर्यंत (Delhi) पोहोचले आहे. अशातच बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी राणा दाम्पत्यावर यावरून जोरदार निशाणा साधला आहे. (Bacchu Kadun Latest News in Marathi)

तुम्हाला लाज वाटत नाही का, अशा पद्धतीने वागायला. तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या घरासमोर एखादा कार्यक्रम ठेवला तर चालेल का तुम्हाला. हे योग्य नाही आहे. आधी आपण दादागिरी करायची, कोणी केली तर तुम्ही दादागिरी करता, असही म्हणायचं. आम्ही एक थोबाडीत मारतो, तुम्ही उभे रहा, असाच त्याचा अर्थ झाला? शिवसेना या मुठीतील नाही. सुदैव आहे तुमचं की तुम्हाला दणके बसले नाहीत, तुम्ही त्यातच खुशी माना, असा इशाराच बच्च कडू यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे.

Bacchu Kadun on Navneet Rana and ravi rana, Bacchu Kadun Latest News in Marathi, Navneet Rana Latest News
नाना पटोले हेच खरे गुन्हेगार; राष्ट्रवादीचा पलटवार

प्रामाणिक दादागिरीतून शिवसेनेची निर्मिती झाली. शिवसेनेची दादागिरी वायफळ नाही. मातोश्री हे शिवसेनेचे श्रद्धास्थान, प्रेरणा स्थान आहे. तिथे जाऊन तुम्ही असं वागता, ही दादागिरी नाही का? असा सवाल बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला केला. राणा दाम्पत्याला आता तक्रार करण्यासाठी दिल्लीशिवाय कोणतही ठिकाण उरलं नाही. सरकारी कार्यालयात तक्रार केली तरी त्याची दखल भाजपच्या कार्यालयातून घेतली जाते, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.

याचवेळी त्यांनी हनुमान चालीसा हा देशाचा मुद्दा आहे का? असाही सवाल उपस्थित केला. आपापल्या धर्मातील लोकांनी घरात, मंदीर, मस्जिदमध्ये दहा वेळा त्यांनी म्हणावे. त्यासाठी रस्त्यावर येण्याची गरज नाही. रस्त्यावर फडकाविण्याचा विषय असेल तर तिरंगा फडकावा. रुग्णालयात जा, गोर-गरीबांची सेवा करा, सात दिवसांचा हनुमान चालीसा पठणाचा सप्ताह ठेवा, आम्ही त्यांना वर्गणी देऊ, अशी खोचक टिकाही बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.