जयंत पाटलांच्या कार्यक्रमाला भाजपच्या आमदारांची उपस्थिती; राजकीय वर्तुळात चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते
Jayant Patil
Jayant Patilsarkarnama

अकोला : सहकार नेते माजी आमदार भय्यासाहेब तिडके यांचा 75 व्या अमृत महोत्सव सोहळा मुर्तीजापूरमध्ये आज पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) व माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे उपस्थित होते.

धर्माचा प्रभाव नसलेल्या, तर देश घडविण्याचा ध्यास घेणाऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारे ॲड. भैयासाहेब तिडके यांचे सहकार क्षेत्राला मार्गदर्शन मिळत राहील व सहकार बलशाली होत राहील, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पाटील यांच्या हस्ते 'सहकाराचा मानबिंदू' या ॲड. भैयासाहेब तिडके अमृत महोत्सव गौरव ग्रंथाचे विमोचन करण्यात आले.

Jayant Patil
खैरे म्हणाले, मंत्रीपद न मिळाल्याच्या निराशेतूनच शिरसाटांचा थिल्लरपणा..

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यासपीठावर उपस्थिती होती. विशेष म्हणजे, या सोहळ्याला भाजपचे (BJP) दोन आमदारही उपस्थित होते. मुर्तीजापूर मतदार संघाचे आमदार हरीश पिंपळे आणि अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाखळे हे भाजपचे आमदार उपस्थित होते.

भाजपचे आमदार पिंपळे आणि भारसाखळे यांनी जयंत पाटील, राजेंद्र शिंदे यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेतला. त्यांच्यात अनेक गप्पाही यावेळी रंगल्या. तर भाजपच्या आमदारांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार तिडके यांचे कौतुक केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Jayant Patil
युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षांनी केलेल्या निवडीला जिल्हाध्यक्षांचे आव्हान

या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष कोरपे, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी आमदार हरिदास भदे, जिल्हा निरीक्षक प्रवीण कुंटे, डॉ. आशाताई मिरगे, प्रा. विश्वनाथ कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे त्याचबरोबर प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in