शिंदे गटाच्या सभेला माजी आमदार बाजोरियांची उपस्थिती; अकोल्यातही सेनेला खिंडार

माजी आमदार बाजोरिया यांनी सोमवारी मुंबईत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेवून त्यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.
Eknath Shinde's Meeting at Mumbai
Eknath Shinde's Meeting at MumbaiSarkarnama

अकोला : शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाची प्रातिनिधिक सभा सोमवारी १८ जुलै रोजी मुंबईत (Mumbai) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अकोल्याचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची उपस्थिती असल्याने शिवसेनेच्या गटातून अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत.

शिंदे गटाने अकोला शिवसेनेमध्ये ((Shivsena) फूट पाडून माजी आमदार बाजोरियांना गळाला लावले आहे. शिंदे गटात सहभागी झालेल्या बाजोरिया यांच्यासोबत अकोला (Akola) जिल्ह्यातील काही नेतेही जाण्याची शक्यता आहे. मात्र, थेट शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याशिवाय हे नेते पुढे पाऊल टाकण्यास तयार नाहीत. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी नियोजित या गटाचा मुंबई दौराही रद्द झाला होता. त्यापूर्वी माजी आमदार बाजोरिया यांनी सोमवारी मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची मुंबईत शिंदे गटाच्या प्रातिनिधिक सभेला उपस्थितीने हे सिद्ध झाले आहे.

भेटायला गेले अन्....!

माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया हे मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. हॉटेलमध्ये आयोजित या सभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजोरिया तेथे दिसले. त्यांनी आस्थेने विचारपूस करीत बाजोरिया यांना थेट सभेत घेवून गेल्याची माहिती आहे. याबाबत बाजोरिया यांच्याशी संपर्क साधला त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Eknath Shinde's Meeting at Mumbai
ठाकरेंच्या पोटात गोळा : एकनाथ शिंदे गटातील १२ खासदारांचा आकडा पंधरावर जाणार

‘त्या’ फोनने निर्माण केला संभ्रम!

शिवसेनेच्या एका माजी मंत्र्यांना अकोल्यातील माजी आमदार बाजोरिया यांच्यासोबत शिवसेनेचे काही पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या गटातील त्यांच्या निकटवर्तीयांना फोन करून शिंदे गटात सहभागी होण्यापूर्वी फेरविचार करण्याची विनंती केली. त्यामुळे या मंत्र्यांचे अकोल्यातील निकटवर्तीय शिवसेना नेत्यांनी मुंबईला जाण्यापूर्वी मातोश्रीवर एकवेळ विचारणा करण्यासंदर्भातील भूमिका घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in