Onion Issue : कांदाप्रश्न पेटला: अमरावतीत फडणवीसांच्या गाडीवर कांदा फेकण्याचा प्रयत्न

या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
onion Issue
onion IssueSarkarnama

अमरावती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गाडीवर अमरावतीत कांदा (Onion) फेकण्याचा प्रयत्न झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून ही कृत करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Attempt to throw onion on Devendra Fadnavis' car in Amravati)

राज्यात कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडले आहेत. मिळणाऱ्या भावातून वाहतुकीचा खर्चही वसूल होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. तो असंतोष काल सोलापुरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यक्रमावेळी शेतकरी संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने दाखवून दिला होता.

onion Issue
Chavan on sanjay Jadhav : अशोक चव्हाणांनी टोचले खासदार संजय जाधवांचे कान : ‘उद्धव ठाकरे एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस...’

विरोधी पक्षाने अधिवेशनादरम्यान कांद्याचा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, नाफेडकडून कांदा खरेदी सुरू करण्यात येईल, असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र, अजूनही काही ठिकाणी नाफेडकडून कांदा खरेदी सुरू झालेली नाही, हे वास्तव आहे.

onion Issue
Shivsena News : ‘उद्धव ठाकरेंची साथ सोडा अन॒ आमच्याकडं या; २० कोटींचा फंड देतो : शिवसेनेच्या ४ नगरसेवकांना ऑफर’

दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस हे आज अखिल भारतीय कलवार कलाल कलार महासभेनिमित्त अमरावतीमध्ये आहेत. त्या कार्यक्रमाला आलेले फडणवीस यांच्या गाडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून कांदे फेकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in