आशिष शेलार सरकारचा भ्रष्टाचार काढत असतात, म्हणून...

सरकारमधला भ्रष्टाचार ते काढत असतात. त्यामुळे त्यांना (Ashish Shelar) धमकी आली असेल. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आज येथे म्हणाले.
आशिष शेलार सरकारचा भ्रष्टाचार काढत असतात, म्हणून...
Devendra Fadanvis and Ashish ShelarSarkarnama

नागपूर : आशिष शेलार नेहमी सरकार विरोधात भूमिका मांडतात. सरकारमधला भ्रष्टाचार ते काढत असतात. त्यामुळे त्यांना (Ashish Shelar) धमकी आली असेल. पोलिसांनी (Police) ही बाब गांभीर्याने घ्यावी, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आज येथे म्हणाले. केवळ पक्ष वा पुढाऱ्यांनीच नव्हे तर महिलांबाबत वक्तव्य करताना सर्वांनीच मर्यादा पाळायला हवी, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.

संघ मुख्यालय आणि स्मृती भवन परिसराची रेकी करणे ही सर्वांसाठीच गंभीर बाब आहे. हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने हाताळावे. पोलिस यंत्रणेलासुद्धा याची जाणीव असून तो योग्य ती खबरदारी घेतीलच, असेही फडणवीस यांनी सांगितले.

नागपूरमध्ये तीन ते चार महिन्यांपूर्वी जैश ए महम्मद या अतिरेकी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेकी केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी काश्मीर येथून एका युवकाला अटक केली आहे. त्याच्या सांगण्यानुसार तो नागपूरला येऊन गेला. संघ मुख्यालयासह काही संवेदनशील आणि धार्मिक स्थळाची त्याने रेकी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेला अधिक सज्ज राहण्याची आवश्यकता असल्याचे पत्रकारांसोबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. सतत दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात येत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत तपास करण्याची विनंतीही त्यांनी पत्रातून केली आहे.

Devendra Fadanvis and Ashish Shelar
आशिष शेलार पोलिस ठाण्यात; दरेकर, लाड यांच्यासह कार्यकर्ते संतप्त

आशिष शेलार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सातत्याने दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात आली आहे. तसेच एक अज्ञात इसम देत असून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली जात आहे. याबाबतची तक्रार त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहून केली आहे. या तक्रारी दरम्यान दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची शेलार यांनी विनंती केली आहे. दरम्यान आशिष शेलार यांना यापूर्वी एकदा २०२० मध्ये अशाच प्रकारे धमकी देण्यात आली होती. त्यावेळीही त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर धमकी देणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती. तर त्यापूर्वी अतिरेक्यांकडे आमदार आशिष शेलार यांच्यासह अन्य दोन हिंदुत्ववादी व्यक्तींची रेकी केल्याची माहिती सापडली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा त्यांना धमकी देण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.