Ashish Deshmukh News : फडणवीस पोहोचले आशिष देशमुखांच्या घरी, देशमुख म्हणाले...

Devendra Fadanvis : देशमुख आता सावनेरमधून लढणार का?
Dr. Ashish Deshmukh and Devendra Fadanvis
Dr. Ashish Deshmukh and Devendra FadanvisSarkarnama

राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज (ता. २०) अचानक कॉंग्रेस नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे त्यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यामुळे देशमुख आता सावनेरमधून लढणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

देवेंद्र फडणवीस काल रातोरात (ता. १९) गुपचूप दिल्लीला जाऊन आले. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात त्यांनी अचानक दिल्ली दौरा केला असल्याचे सांगण्यात येत आहे. तेथून आल्यावर आज सकाळी त्यांनी आशिष देशमुखांचे घर गाठले. फडणवीसांनी काल सावनेरमध्ये एक सूचक वक्तव्य केले होते. त्याचा अर्थ आजच्या भेटीशी जोडला जात आहे.

सावनेरमध्ये कोणताही नवीन प्रयोग आम्ही करणार नाही. येथे तुमच्यातीलच एक लढणार आहे, असे फडणवीस काल म्हणाले होते आणि आज अचानक त्यांनी देशमुखांचे घर गाठले. कालचे वक्तव्य आणि आजची भेट, याचा एकच अर्थ निघतो, तो म्हणजे आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आणि सावनेरमधून लढणार, असे राजकीय जाणकार सांगतात.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख भाजपच्या तिकिटावर काटोलमधून लढले होते आणि तेथे त्यांचे काका माजी मंत्री अनिल देशमुख यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये रमले नाही आणि स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेसमध्येही त्यांचे फार काळ जमले नाही आणि त्यांनी थेट श्रेष्ठींसोबत पंगे घेणे सुरू केले.

Dr. Ashish Deshmukh and Devendra Fadanvis
Ashish Deshmukh News : सावनेरमध्ये भाजप डॉ. आशिष देशमुखांवर डाव खेळणार? बावनकुळेंच्या भेटीनंतर रंगली चर्चा !

थेट राहुल गांधी यांना सल्ला देणे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात थेट भूमिका घेणे आशिष देशमुखांनी सुरूच ठेवले. त्यानंतर त्यांना नोटिसही बजावण्यात आली होती. नंतर निलंबित करण्यात आले. तेव्हाच राजकीय पंडितांना अंदाज आला होता की, देशमुख आता फार काळ कॉंग्रेसमध्ये थांबणार नाहीत. त्यांचा तो अंदाज आता खरा ठरताना दिसतो आहे.

फडणवीस विदर्भाचे हित साधणारे नेते आहेत. मी सध्या कॉंग्रेसमध्ये आहे, पण निलंबित आहे. कॉंग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांना जसे निलंबनानंतर पुन्हा पक्षात घेण्यात आले. त्याचप्रमाणे मलासुद्धा अपेक्षा आहे. २००९मध्ये सावनेरमध्ये चांगल्या प्रकारे निवडणूक लढलो. २०१४ मध्ये अनिल देशमुखांचा काटोलमध्ये पराभव केला.

Dr. Ashish Deshmukh and Devendra Fadanvis
Ashish Deshmukh News : माझी सूचना पक्षाच्या हिताची होती, नोटीस बजावली ही दुर्दैवाची बाब !

2०१९मध्ये माझ्यासाठी नवखा असलेल्या नागपूर (Nagpur) दक्षिण-पश्‍चिम या तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या विरोधात लढलेलो आहे. आज तरी पक्ष बदलण्याचा विषय नाही. फडणवीस नाश्‍ता करायला माझ्या घरी आले होते. विदर्भाचे (Vidarbha) हित साधणारा कुणी नेता असेल, तर ते फडणवीस आहेत. यासाठी त्यांचं कौतुक आहे, असे आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com