Ashish Deshmukh News: काँग्रेसने निलंबित केलेले आशिष देशमुख अमित शाहांना भेटणार !

Ashish Deshmukh News: आशिष देशमुख यांची काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली होती.
Ashish Deshmukh
Ashish Deshmukh Sarkarnama

Political News: आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आल्यामुळे पक्षातील नेत्यांविरोधात वक्तव्य करणं त्यांना चांगलच भोवलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

आशिष देशमुख यांनी काँग्रेसच्या नेत्यांविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने त्यांच्यावर ही कारवाई केली. यावर प्रतिक्रिया देताना हकालपट्टीचा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचं आशिष देशमुख यांनी म्हटलं.

Ashish Deshmukh
Ahmednagar Politics: फडणवीसांच्या शेजारच्या खुर्चीवर विखे बसले अन्‌ राम शिंदे व्यासपीठावरून खाली निघाले; पण....

आता आशिष देशमुख हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनीच माध्यमांशी बोलताना दिली आहे. याआधी काही दिवसांपूर्वीच आशिष देशमुख यांची देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूरमध्ये भेट झाली होती. त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. आता देशमुख अमित शाह यांची भेट घेणार असल्याने त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देशमुख म्हणाले, "देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे माझ्याकडे आले होते. त्यांच्याकडे मी एक विनंती केली. विदर्भामधून गॅसची पाईपलाईन ओडिसाला जात आहे. या गॅसच्या पाईपलाईनमधून आपण जर गॅस घेतला तर इंटीग्रेटेड फर्टिलाइजर कॉम्प्लेक्स हा नागपूरच्या आसपास उभा होऊ शकतो. त्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांना कमी दरात खताची निर्मिती होऊन उपलब्धतता होईल".

Ashish Deshmukh
Ahmednagar Politics: राम शिंदे-विखे पाटील वादावर फडणवीस थेटच बोलले; म्हणाले, वाद असले तरी...

"त्यासोबतच लाखो बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हा जो इंटीग्रेटेड फर्टिलाइजर कॉम्प्लेक्स आहे, तो देशामध्ये स्थापन करतात ते आहे इफको. इफको ही शेतकऱ्यांची एक युनिट आहे. जी केंद्र सरकारच्या सहकारीता विभागामध्ये येते. या विभागाचे मंत्री अमित शाह आहेत. माझी विनंती फडवीसांना आहे की हा प्रकल्प विदर्भामध्ये आणण्यासाठी गरज पडली तर अमित शाह यांना भेटू. ही मागणी मान्य करण्यासाठी आमची त्यांच्याशी भेट होईल", असं आशिष देशमुख यांनी सांगितलं.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com