सरपंच थेट जनतेतून निवडायचा असल्याने राजकीय पक्ष उतरले मैदानात, चुरस वाढणार...

अकोला (Akola) जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीने तर सरपंच पदासाठी उमेदवारांना एबी फार्म देणार असल्याचे जाहीर केले आहे. अकोला जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतीची निवडणूक डिसेंबरमध्ये होत आहे.
Akola
AkolaSarkarnama

अकोला : राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ अखेर मुदत संपणाऱ्या ७ हजार ७५७ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर तालुक्यातील तब्बल २६६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. यावेळी सरपंच निवडणूक थेट होत असल्याने आतापर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीपासून काहीसे दूर राहणारे राजकीय पक्षही या निवडणुकीसाठी थेट मैदानात उतरणार आहेत.

अकोला (Akola) जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीने तर सरपंच पदासाठी उमेदवारांना एबी फार्म देणार असल्याचे जाहीर केले आहे. अकोला जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतीची निवडणूक डिसेंबरमध्ये होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, त्यातही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत (Election) स्थानिक पॅनलला अधिक महत्त्व राहत आले आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांच्या आपसातील मतभेदाची डोकेदुखी नको म्हणून कोणताही पक्ष थेट निवडणुकीत सहभागी होत नव्हता. आता मात्र, थेट जनतेतून सरपंच (Sarpanch) निवडून दिला जाणार असल्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोणत्या पक्षाचे प्राबल्य आहे, हे अधोरेखित होणार आहे.

राजकीय पक्षांनी त्यांच्या चिन्हावर उमेदवार उभे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात अकोल्यातील सभेत सरपंचपदाच्या निवडणुकीत वंचितेचे उमेदवार दिले जातील, असे जाहीर केले होते. राज्यात शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे शिवसेनेचे दोन्ही गट त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सरपंचपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर उमेदवार देण्याची तयारी करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून त्यासंदर्भात जिल्ह्यात चाचपणी सुरू झाली आहे.

आचारसंहितेची काटेकोरअंमलबजावणी करण्याचे निर्देश..

जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधीत निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेसंदर्भात सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची संयुक्त बैठक नियोजन भवनात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, अभयसिंह मोहिते, डॉ. नीलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार आदी उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. आचारसंहिता अंमलबजावणीसाठी प्रत्येक तालुकानिहाय पथके तयार करावीत. प्रत्येक तालुक्यात ग्रामपातळीवरील यंत्रणेची बैठक घेऊन माहिती द्यावी. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिलेत.

Akola
Pusad : किशोरवयीन मुलांना मोबाईल बंदी, बांशी ठरली महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत...

या तालुक्यांमध्ये होत आहे निवडणूक..

तालुका ग्रा.पं.

तेल्हारा २३

अकोट ३७

मूर्तिजापूर ५१

अकोला ५४

बाळापूर २६

बार्शीटाकळी ४७

पातूर २८

एकूण २६६

असा आहे निवडणूक कार्यक्रम..

२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर ः अर्ज दाखल करण्याची मुदत

५ डिसेंबर ः अर्जांची छाननी

७ डिसेंबर ः अर्ज मागं घेण्याचा दिनांक, निवडणूक चिन्ह वाटप

१८ डिसेंबर ः मतदान

२० डिसेंबर ः मतमोजणी

२३ डिसेंबर ः निकालाची अधिसूच

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com