सत्ता येताच माजी नगराध्यक्षाचा दुरुपयोग सुरू; पक्षाच्या कार्यालयात किटचे नियमबाह्य वाटप...

काल तुमसर येथे भाजपच्या (BJP) संपर्क कार्यालयात तुमसरचे नगराध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्या हस्ते कामगारांना सुरक्षेची किट दिली गेली.
BJP Office Tumsar
BJP Office TumsarSarkarnama

भंडारा : सत्ता येताच भंडारा (Bhandaara) जिल्ह्यात भाजपद्वारे सत्तेचा दुरूपयोग सूरु झाला असून तुमसरात भाजप संपर्क कार्यालयात मजुरांना पेटीचे नियमबाह्यरीत्या वाटप करण्यात आले. एका शासकीय योजनेचा वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केला जात आहे. त्यामुळे सामान्यजनातून टीकेची झोड उठविली जात आहे.

काल तुमसर येथे भाजपच्या (BJP) संपर्क कार्यालयात तुमसरचे नगराध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्या हस्ते कामगारांना सुरक्षेची किट दिली गेली. वास्तविक पाहता साहाय्यक कामगार आयुक्तांद्वारे (Labour Commissioner) नोंदणीकृत मजुरांना शासकीय स्तरावर हे पेटी वाटप केले जाते. या पेटीत टॉर्च, रबर मोजे, टोपी तसेच 5 हजार रुपये किमतीचे साहित्य असता. नोंदणी केलेल्या मजुरांना सामाजिक सुरक्षा, मुलांना शैक्षणिक मदत, आरोग्याची सुविधा तसेच काम करीत असताना सुरक्षा किट असलेली पेटी पुरविली जाते.

आतापर्यंत शासकीय स्तरावरून विशेषतः साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून (Commissioner Office) ही सुरक्षा किट असलेली पेटींचे वाटप केले जात होते. मात्र एका शासकीय वस्तूचे तुमसरात एका पक्षाच्या कार्यालयात वाटप झाले. यावरून सुद्धा विविध चर्चांना उधाण आले आहे. भाजपने सत्ता मिळविताच त्याचा दुरुपयोग सुरू केला असल्याची ओरड सुरू झाली आहे. हा मुद्दा जरी राजकीय वाटत असला तरी यात मुख्य प्रश्न हाच की शासकीय वस्तूचे वाटप पक्ष कार्यालयात कसे होऊ शकते? भंडारा जिल्ह्यातील साहाय्यक आयुक्तांनी एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात शासकीय पेटी वाटपाची परवानगी कशी दिली? ज्या मजुरांना पेटी वाटप झाले त्यांची खरच नोंदणी होती का, असे एक ना अनेक प्रश्न या प्रकारानंतर उपस्थित केले जात आहेत.

BJP Office Tumsar
भुजबळ-राणेंचे बंड स्वबळावर, शिंदेचे भाजप पुरस्कृत; शिवसेनेचा खोचक टोला

दुसरीकडे तुमसरात भाजप संपर्क कार्यालयात पेटी वाटप कार्यक्रम निवडणुकीच्या दृष्टिकोनातून केलेली प्रसिद्ध आहे, असे मानले जात आहे. येत्या काही महिन्यांत नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यात तुमसर नगरपरिषदेच्याही नंबर लागला आहे. त्यामुळे तुमसर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांचा हा खटाटोप सुरू असल्याचे बोलले जात आहे.मात्र करदात्यांच्या पैशातून आलेल्या निधीतून घेतलेल्या सुरक्षा पेटीच्या वापर आपल्या प्रचारासाठी करणे, हे सर्वथा चुकीचे आहे. त्यात ही शासकीय वस्तूच्या आपल्या पक्षाच्या कार्यालयात वाटप ही तर घोडचूक आहे. त्यामुळे या प्रकरणाची योग्य चौकशी झाली, तर सहायक कामगार आयुक्त चौकशीच्या फेऱ्यात नक्कीच अडकतील, असे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in