मोठी बातमी : आमदार रवि राणांविरोधात अटक वॉरंट; विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का?

Ravi Rana | Amravati | Vidhan Parishad | : वॉरंट घेवून अमरावती पोलिस मुंबईत दाखल
मोठी बातमी : आमदार रवि राणांविरोधात अटक वॉरंट; विधान परिषद निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का?
Ravi Rana | Amravati Sarkarnama

मुंबई : बडनेराचे अपक्ष आमदार रवि राणा यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. अमरावती महापालिका आयुक्तांवर झालेल्या शाईफेक प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात हे वॉरंट जारी केले आहे. दरम्यान अमरावती पोलिस हे वॉरंट घेवून राणा यांच्या खार येथील निवासस्थानी गेले होते. मात्र यावेळी रवी राणा किंवा कुटुंबातील अन्य कोणताही सदस्य उपस्थित नव्हते. दरम्यान या वॉरंटमुळे विधान परिषद निवडणुकीपूर्वीच आमदार राणा आणि भाजपला मोठा धक्का बसला असल्याची चर्चा आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फेब्रुवारी महिन्यामध्ये आमदार रवी राणा (ravi rana) आणि खासदार नवनीत राणा यांच्यावतीने अमरावती येथील राजापेठ उड्डानपुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हा पुतळा बसवल्याने तो महापालिकेच्या वतीने हटवण्यात आला. त्यावर संतप्त झालेल्या राणा यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर (pravin ashtikar) यांच्या अंगावर शाईफेकून निषेध व्यक्त केला.

याप्रकरणी राजापेठ पोलिस स्थानकात आमदार रवी राणा आणि अन्य 11 आरोपींवर कलम 307 आणि इतर कलमांनुसार हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात न्यायालयात तारखेला उपस्थित न राहिल्याने अमरावती न्यायालयाने राणा यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.दरम्यान अमरावती पोलिस हे वॉरंट घेवून राणा यांच्या खार येथील निवासस्थानी गेले होते. मात्र यावेळी रवी राणा किंवा कुटुंबातील अन्य कोणताही सदस्य उपस्थित नव्हते.

याच प्रकरणात खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या विरोधात संसदेत हक्कभंग दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिस आयुक्तांसह पोलीस महासंचालक रजनीश सेठ, अमरावतीचे पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव यांना ६ एप्रिल रोजी लोकसभा सचिवालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

भाजपला विधान परिषदेत धक्का?

विधान परिषद निवडणुकीत सध्या विजयी मतांच्या कोटा २६ वर आला आहे. महाविकास आघाडीच्या सध्याच्या संख्याबळानुसार त्यांचे सहा, यात शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि अपक्ष-छोट्या पक्षांच्या आमदारांच्या सहाय्याने काँग्रेसचे २ आमदार निवडून येवू शकतात. याशिवाय संख्याबळानुसार भाजपचे ४ आमदार निवडून येवू शकतात. मात्र भाजपने ५ उमेदवार दिल्याने त्यांना पाचवा उमेदवार जिंकण्यासाठी अतिरिक्त २२ मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे प्रत्येक मत महत्वाचे बनले आहे. अशावेळी राणा यांना अटक झाल्यास भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in