Arni APMC Election Analysis : ना पक्ष, ना आघाडी, जात ठरली सगळ्यात भारी !

Results : निकाल जाहीर झाला तेव्हा मात्र सर्वांना धक्काच बसला.
Arni APMC
Arni APMCSarkarnama

Yavatmal District's Arni APMC Election Analysis : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. ३० एप्रिल रोजी निकाल जाहीर झाला तेव्हा मात्र सर्वांना धक्काच बसला. निवडणूक प्रक्रियेत असणाऱ्या जाणकार अभ्यासकांनासुद्धा निकालाचे गणित जुळवता आलेले नाही. (Even scholars have not been able to reconcile the results.)

निकाल हाती आले तेव्हा सर्वांनाच कळून चुकले की या निवडणुकीत ना पक्ष चालला, ना आघाडी चालली; येथे चालली फक्त जात आणि पैसा. जातीचे गणित जुळवत आपापल्या लोकांना निवडण्यात आले. हे बाजार समितीच्या निकालावरून लक्षात आले. तालुक्यात कुणबी (पाटील) आणि बंजारा समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्याच समाजाच्या प्रतिनिधींना कोणत्याही पक्षाची उमेदवारी मिळते.

तालुक्यातील कोणतीही संस्था असो, ती आपल्याच हातात असावी, असा मानस राजकीय पक्षाचा असतो. परंतु आता पक्ष नाही तर जातीवर हा विषय आलेला आहे. आपल्याच जातीला प्रतिनिधित्व मिळावे, हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन मतदार राजा मतदान करताना दिसून आला. आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाचे निवडणुकीचे अवलोकन केले. तर निवडणूक प्रक्रियेत उमेदवार म्हणून उभे असलेल्यांपैकी एक दोन जागांवर तालुक्यातील अल्पसंखेत असलेल्या जातीचे उमेदवार निवडून आले.

जास्तीत जास्त उमेदवार हे बंजारा व पाटील कुणबी समाजाचे निवडून आलेले आहेत. आपला माणूस कोणत्याही पक्षात किंवा पॅनलमध्ये असला तरी त्यालाच निवडून आणायचे, हे जातीचे समीकरण होते. त्यामुळे संख्येने जास्त मतदार असलेल्या समाजाचे प्रतिनिधीच या निवडणुकीत विजयी झाले. तर त्यांच्यासोबत असलेले अल्पसंख्य उमेदवार अपयशी झालेले आहेत. ही निवडणूक पक्ष किंवा पॅनलची झालेली नसून केवळ जातिनिहाय निवड झाली. हे निवडणुकीमधील क्रॉस व्होटींग झालेल्या निवडीतून लक्षात आले.

Arni APMC
Ramtek APMC Result News : नेता विरुद्ध कार्यकर्ता संघर्षात कार्यकर्ता जिंकला, आमदार केदारांना रामटेकमध्ये धक्का !

बाजार समितीच्या (APMC Election) सोसायटी मतदारसंघात एकूण ५६३ मतदान होते. त्यांपैकी ३०५ मते क्रॉस झाले. काही मतपत्रिका तर केवळ जातिनिहाय असल्याचे दिसून आले. यावरून असे लक्षात येते की पक्षाचा नाही तर जातीचा विचार करूनच उमेदवार निवडून दिल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. यावरून भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्येसुद्धा पक्ष नाही तर जातीवरच निवडणुका (Elections) होणार का, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com